घरदेश-विदेशयुपीत महिला पोलीस कॉन्स्टेबलवर बलात्कार

युपीत महिला पोलीस कॉन्स्टेबलवर बलात्कार

Subscribe

उत्तरप्रदेशात महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. दुधातून गुंगीचं औषध देऊन हा बलात्कार करण्यात आला आहे.

दुधातून गुंगीचं औषध देऊन उत्तरप्रदेशात महिला पोलीस कॉन्स्टेबलवर सहकाऱ्यानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, पीडितेनं या घटनेची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधीर कुमार यांच्याकडे केली आहे. त्यानंतर बलात्कारी पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे. शिवाय, त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. ज्यावेळी पीडित महिला बलात्कारी पोलीस सहकाऱ्याच्या प्रेमात होती, त्यावेळी तिला दिवस देखील गेले होते. पण, पीडितेवर गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. या साऱ्या प्रकारानंतर पीडितेनं न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे. आरोपीविरोधात भांदवि कलम ३७६, ३१३ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

काय आहे सारा प्रकार

पीडित पोलीस कॉन्स्टेबल आणि बलात्कारी पोलीस यांच्यामध्ये सुत जुळले. त्यानंतर दोघांमधील जवळीक दिवसेंदिवस वाढत गेली. दरम्यान, आरोपीनं महिलेला तुझं पहिलं लग्न मोडून टाक आपण लग्न करू अशी बतावणी केली. पीडितेनं आपल्या पतीपासून घटस्फोट देखील घेतला. पण, त्यानंतर मात्र आरोपीनं लग्न करण्यास नकार दिला. एके दिवशी आरोपी पीडितेच्या घरी आला आणि मानसिक तणावाखाली असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्यानं पीडितेला दुधातून गुंगीचं औषध दिलं. ज्यावेळी पीडितेला सकाळी जाग आली, त्यावेळी तिला आपल्यावर बलात्कार झाल्याची जाणीव झाली. यानंतर पीडितेनं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण, पोलिसांनी देखील सदर बाब गांभीर्यानं घेतली नाही. अखेर पीडितेनं निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -