घरदेश-विदेश'युएई'त उभारणार महात्मा गांधींचे संग्रहालय

‘युएई’त उभारणार महात्मा गांधींचे संग्रहालय

Subscribe

२ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान शेख झायेद आणि महात्मा गांधींचे संग्रहालय अबू धाबी येथे होणार सुरु

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या कार्याची छाप जगभरात उमटवली आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे मोलाचे योगदान असले तरीही भारतात बाहेरही त्यांच्या नावाची चलती होती. महात्मा गांधींशी निगडीत आठवणी लोकांनाही अनूवता याव्यात म्हणून ‘युएई’तील अबू धाबी येथे महात्मा गांधींचे संग्रहालय उभारले जाणार आहे. २ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान कधीही या संग्रहाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती संयुक्त अरब अमिरातमधील भारताचे राजदूत नवदीप सिंग सुरी यांनी दिली. उच्चस्तरीय बैठकीत हा निर्मण घेण्यात आला. भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि शेख अब्दुल्ला यांनी मागील महिन्यात या प्रकल्पाबद्दल घोषणा केली असून यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

परराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय सहकार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झयेद अल नाहयान जून महिन्यात भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी शेख झायेद आणि महात्मा गांधींच्या संग्रहालयाची संकल्पना बोलून दाखवली होती. या संग्रहालयाला झायेद-गांधी संग्रहालय म्हणून नाव देण्यात येईल. या संग्रहालयात महात्मा गांधी आणि शेख झायेद यांच्या जीवनाशी निगडीत अनेक वस्तू लोकांना पहायला मिळतील. युएइमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या संग्रहालयाचे निर्माण केले जात आहे.

- Advertisement -

“या वर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती आहे. दिलेल्या तारखे दरम्यान संग्रहालयाचे उद्घघाटन करण्यात येईल. संग्रहालयासाठी अबू धाबी येथे जागेचा शोध घेण्याचे काम सुरु केलयं. युएइत प्रवास करणाऱ्या भारतीयांनाही संग्रहालय बघात येईल याची काळजी घेण्यात आली आहे. हे एक डिजीटल संग्रहालय असणार आहे. दुबई, अबू धाबी आणि शारजाहा येथून ही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देऊ शकणार आहे.”- भारताचे राजदूत नवदीप सिंग सुरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -