घरसंपादकीयदिन विशेषडायनामाइटचे निर्माते शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल

डायनामाइटचे निर्माते शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल

Subscribe

अल्फ्रेड बर्नाल्ड नोबेल हे एक स्वीडिश शास्त्रज्ञ होते. अल्फ्रेड यांचा जन्म २१ ऑक्टोबर १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण खासगी शिक्षकांकडून घेतले. नवव्या वर्षी शिक्षणासाठी ते रशियातील सेंट पिट्सबर्ग येथे होते. तेथून ते पॅरिसला गेले. पुढे त्यांनी केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. येथेच त्यांचा विस्फोटकांशी परिचय झाला.

अल्फ्रेड बर्नाल्ड नोबेल हे एक स्वीडिश शास्त्रज्ञ होते. अल्फ्रेड यांचा जन्म २१ ऑक्टोबर १८३३ रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण खासगी शिक्षकांकडून घेतले. नवव्या वर्षी शिक्षणासाठी ते रशियातील सेंट पिट्सबर्ग येथे होते. तेथून ते पॅरिसला गेले. पुढे त्यांनी केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. येथेच त्यांचा विस्फोटकांशी परिचय झाला. नायट्रोग्लिसरिनचा सुरक्षित उपयोग या विषयावर ते सखोल संशोधन करीत होते. त्यांचे तीन भाऊ पिट्सबर्ग येथे व्यवसाय करत होते. शेवटी १९६३ मध्ये त्यांना ते पेटंट मिळाले. हेच ते ‘ब्लास्टिंग ऑइल.’ यातूनच पुढे डायनामाइटचा जन्म झाला.

नायट्रोग्लिसरिन व सिलिका एकत्र करून अल्फ्रेड यांनी डायनामाइट तयार केले. यामुळे ते सिलिंडरमध्ये भरणे सुलभ झाले. त्यावर होणारा तापमान व दाबाचा परिणाम नियंत्रणात आला. धोके टाळून ते हाताळणे सुकर झाले. या शोधामुळे विस्फोटाची शक्ती वाढली. पूर्वीच्या गनपावडरपेक्षा ती पाच पट अधिक शक्तिशाली झाली. खाणकामात व मोठ्या प्रमाणावरील बांधकाम क्षेत्रात यामुळे क्रांती आली. डायनामाइटची मागणी प्रचंड वाढली. या उत्पादनामुळे अल्फ्रेड यांचे जगभर नाव झाले आणि हीच त्यांची पुढे ओळख झाली. त्यांच्या नावावर एकूण ३५५ पेटंट नोंद आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.

- Advertisement -

त्यांनी १५० पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी आयुष्यभर जमवलेल्या सर्व संपत्तीचा एक ट्रस्ट तयार केला. त्यात ३१ मिलियन सेक म्हणजे २६५ मिलियन डॉलर्सचा निधी जमा केला. यातून जगाची शांती वाढावी व जगाचा विकास व्हावा, विश्वाचे कल्याण व्हावे अशी त्यांची कल्पना होती. जमा रकमेच्या व्याजातूनच आजतागायत नोबेल पुरस्कार दिले जात आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीयशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी दरवर्षी पुरस्कारांची घोषणा केली जाते. अशा या थोर शास्त्रज्ञाचे १० डिसेंबर १८९६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -