घरसंपादकीयदिन विशेषचतुरस्त्र लेखक गंगाधर महांबरे

चतुरस्त्र लेखक गंगाधर महांबरे

Subscribe

गंगाधर महांबरे हे चतुरस्त्र लेखक, कवी व गीतकार होते. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी मालवण येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथे झाले. १९४८ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पुढे १९५६ मध्ये पुणे विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली. त्यांनी प्रारंभी मुंबईला शिक्षण विभागामध्ये नोकरी केली. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये विविध पदांवर नोकरी करून ग्रंथालय शास्त्रातील पदविका मिळवली. पुढे त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, किर्लोस्कर ऑईल इंजिनच्या ग्रंथालयात तसेच पुण्याच्या ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ग्रंथपाल म्हणून काम केले.

नोकरी करीत असतानाच (१९४८) त्यांनी मुक्त पत्रकारिता आणि लेखन सुरू केले होते. १९५४ पासून केलेल्या गीतांमधील ध्वनिमुद्रित झालेली त्यांची अनेक भावगीते आजही लोकप्रिय आहेत. वृत्तपत्रे, मासिके, नभोवाणी, दूरदर्शन, चित्रपट, रंगभूमी कॅसेट्स इत्यादींसाठी त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांचे साहित्य नाटिका, बालसाहित्य, चरित्रे, गाण्यांचे संपादन आणि गीतसंग्रह अशा विविध प्रकारांत आहे.

- Advertisement -

‘दिलजमाई’ (१९५२), ‘रंगपंचमी’ (१९५३), ‘सिंधुदुर्ग’ (१९५५), ‘कोल्हा आणि द्राक्षे’ (१९६०) अशा अनेक नाटिका; ‘देवदूत’ (१९५२), ‘संतांची कृपा’ (१९५५), ‘नजराणा’ (१९५५) ही नाटके; ‘गौतम बुद्ध’ (१९५६), ‘जादूचा वेल’ (१९६१), ‘जादूची नगरी’ (१९६२), ‘बेनहर’ (१९७२), ‘शुभम् करोती’ (१९७४), ‘किशोरनामा’ (२००३), ‘मॉरिशसच्या लोककथा’ (२००४) इत्यादी बालसाहित्याची पुस्तके; ‘वॉल्ट डिस्ने’ (१९७६), ‘चार्ली चॅप्लिन’ (२००२), ‘भावगीतकार ज्ञानेश्वर’ (२००२), अशी उपयुक्त पुस्तकेही त्यांनी लिहिली. अशा या चतुरस्त्र लेखकाचे २३ डिसेंबर २००८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -