घरसंपादकीयदिन विशेषकर्तव्यदक्ष निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन

कर्तव्यदक्ष निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन

Subscribe

तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन तथा टी. एन. शेषन हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९३२ रोजी केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील तिरूनेल्लरी या गावी झाला. १९५५ मध्ये शेषन आयएएस परीक्षा सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्या तुकडीतील टॉपर्समधील एक शेषन होते. १९१० मध्ये भारताचे १० वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची निवड झाली.

१९९० ते १९९६ पर्यंत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी चोख बजावली. या काळात भारतातील निवडणूक प्रक्रियेचा चेहरा-मोहरा बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. या काळात त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांची आजच्या निवडणूक प्रक्रियांमध्येही कडक अंमलबजावणी केली जाते. त्यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड होण्यापूर्वी भारतीय निवडणूक प्रक्रियेला मुख्य निवडणूक आयुक्ताचे कार्यच माहीत नव्हते.

- Advertisement -

मतदान ओळखपत्राच्या स्वरूपात मतदाराला ओळख देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. एवढेच नाही तर मतदार ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही, त्यामुळे मतदान ओळखपत्र अनिवार्य करण्याचे कामही त्यांनी केले.

निवडणूक प्रक्रियेला शिस्त लावण्यासाठी त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. या निर्णयांना आडकाठी करणार्‍यांना न जुमानता रोखठोक निर्णय घेत भारतीय निवडणुकांना पारदर्शक अणि निष्पक्ष करण्याचा प्रयत्न केला. १९६० पासून निवडणुकांमध्ये लागू करण्यात आलेल्या आचारसंहितांचे योग्य पालन होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी सर्व उमेदवारांसह नेत्यांना आचारसंहितेचे कठोर पालन करण्यास भाग पाडले. मतदाराला भूलविण्यासाठी उमेदवाराकडून होणार्‍या वारेमाप खर्चाला लगाम बसविण्याचे कार्य त्यांनी केले. अशा या कर्तव्यदक्ष आयुक्तांचे १० नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -