घरसंपादकीयदिन विशेषथोर शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे

थोर शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे

Subscribe

डॉ. शंकर आबाजी भिसे हे भारतीय अनुप्रयुक्त संशोधक होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १८६७ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले. लहानपणापासून त्यांचा कल शास्त्रीय विषयांकडे होता. १८८८-९७ या काळात त्यांनी महालेखापालांच्या कार्यालयात नोकरी केली. नोकरीत असतानाही ते शास्त्रीय ज्ञानावर आधारित चमत्कृतिजनक व मनोरंजक उपक्रम करीत. १८९३ मध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी द सायंटिफिक क्लब ही संस्था त्यांनी स्थापन केली. संस्थेतर्फे त्यांनी १८९४ मध्ये विविध कलासंग्रह हे मासिक सुरू केले.

१९०० मध्ये भिसे यांचे लक्ष मुद्रण व्यवसायातील यंत्रसामुग्रीकडे लागले व त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो, मोनो इत्यादी यंत्रांच्या रचना व कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी ‘भिसोटाइप’ या यंत्राचा शोध लावला. १९१५ मध्ये दर मिनिटास सु. १,२०० विविध प्रकारचे छपाईचे खिळे पाडणारे ‘गुणित मातृका’ हे यंत्र आणि १९१४ मध्ये खिळे पाडणारे आणखी एक असेच नवे यंत्र शोधून काढले व १९१६ मध्ये ते विक्रीस आणले.

- Advertisement -

१९१० मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातील एक भारतीय औषध फार गुणकारी ठरले. त्याचे रासायनिक पृथ्थकरण त्यांनी करवून त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे हे त्यांनी जाणले. १९१४ मध्ये स्वतःच एक नवीन औषध बनवून त्यास ‘बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले व पहिल्या महायुद्धात त्याचा अमेरिकन लष्कराने मोठ्या प्रमाणावर वापर केला. अशा या उपक्रमशील शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -