घरमुंबईजलवाहिनीतील गळती, दूषित पाणी स्त्रोत शोधणारा क्राऊलर कॅमेरा झाला भंगार

जलवाहिनीतील गळती, दूषित पाणी स्त्रोत शोधणारा क्राऊलर कॅमेरा झाला भंगार

Subscribe

 

मुंबई:  मुंबईत कुठेही जलवाहिनी फुटली अथवा दूषित पाणी पुरवठा होत असेल तर ते शोधण्याचे काम जल अभियंता खात्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून ‘क्राऊलर कॅमेरा’ करीत होता. त्यामुळे जल अभियंता खात्याच्या पथकाला जलवहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यास मोठी मदत होत होती. मात्र आता हा कॅमेरा सारखासारखा वापरून व हाताळून तो आता वापरण्याजोगा राहिलेला नाही म्हणजेच तो भंगार झालेला आहे.

- Advertisement -

सध्या जल अभियंता खात्याकडे त्या क्षमतेचा अथवा त्यासम दुसरा कॅमेराच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी जलवाहिनीला नव्याने गळती लागल्यास, जलवाहिनी फुटल्यास तिचा शोध घेऊन ती दुरुस्ती करणे आणखीन कठीण होणार आहे. आता जल अभियंता खात्याला मोलाची मदत करणारा ‘क्राऊलर कॅमेरा’ सदर कॅमेरा नव्याने खरेदी करावा, असे वाटत नाही. त्याऐवजी सदर कॅमेऱ्याची सेवा खासगी पुरवठादाराकडून दोन वर्षांसाठी २० लाख रुपये या भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय जल अभियंता खात्याने घेतला आहे.

वास्तविक, मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. या महापालिकेचे यंदाचा अर्थसंकल्प ५२ हजार कोटी रुपयांचा आहे. तर, पालिकेचे विविध बँकांत तब्बल ८८ हजार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. असे असताना पालिकेकडे काही लाखांचा ‘अत्याधुनिक क्राऊलर कॅमेरा’ खरेदी करण्यासाठी तेवढे पैसे नाहीत की तो कॅमेराच खरेदी न करण्याची मानसिकता आहे ? अशी उलटसुलट चर्चा पालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

- Advertisement -

क्राऊलर कॅमेऱ्याचा उपयोग
पालिका जल अभियंता खाते, गेल्या १२वर्षांपासून क्राऊलर कॅमेऱ्याचा जलवाहिन्यांमधील गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी वापर करीत होते. जलवाहिनीतील अंतर्गत निरीक्षणासाठी देखील या विशेष उपकरणाचा वापर करण्यात येत होता. क्राऊलर कॅमेऱ्याच्या वापरामुळे नागरिकांचा पाणी पुरवठा किमान वेळेत सुरळीत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तसेच दुरूस्तीच्या कामात जलअभियंता विभागाचा महत्वाचा वेळ वाचण्यासाठीही मदत होत होती. क्राऊलर कॅमेऱ्याच्या माध्यमातून जलवाहिनी गळतीचे नेमके ठिकाण, घटनास्थळाचा व्हिडिओ मिळवणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे शक्य होत होते. कॅमेऱ्याच्या वापरामुळे कधीही हा डेटा उपलब्ध होणे शक्य होत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -