घरसंपादकीयदिन विशेषथोर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण

थोर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण

Subscribe

जयप्रकाश नारायण हे भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९०२ रोजी बिहारमधील सिताबदियार येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक व पुढे पाटणा येथे माध्यमिक शालेय शिक्षण झाले. १९२२ मध्ये ते अमेरिकेस गेले. विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशास्त्रातील एम. ए. पदवी त्यांनी घेतली. १९२९ मध्ये ते भारतात परत आले.

मार्क्सवाद्यांनी मध्यमवर्गीयांशी सहकार्य करावे, त्यांनी चालविलेल्या वसाहतींमधील राष्ट्रीय चळवळीतून अंग काढून एकाकी पडू नये, या लेनिनच्या मताचे ते होते. म्हणून भारतात परत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गांधीजी गोलमेज परिषदेहून परत आल्यानंतर झालेल्या सत्याग्रह-चळचळीच्या दुसर्‍या पर्वात सर्व पुढारी तुरुंगात असताना जयप्रकाश यांनी चळचळीची सूत्रे सांभाळली. १९३३ मध्ये मद्रास येथे त्यांना अटक होऊन एक वर्षाची शिक्षा झाली. अन्य समाजवादी तरुणांच्या साहाय्याने आणि सहकार्याने त्यांनी १९३४ मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.

- Advertisement -

ब्रिटिश सरकारने सुरू केलेल्या वाटाघाटींना, ब्रिटिश सरकारने नेमलेल्या संविधान परिषदेला तसेच देशाच्या फाळणीला जयप्रकाश यांचा विरोध होता. अखेर महात्मा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये राहून समाजवादी समाजरचनेचे ध्येय साध्य होणार नाही; म्हणून त्यांनी १९४८ मध्ये अन्य सहकार्यांच्या मदतीने स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना करून काँग्रेसला पर्यायी पक्ष निर्माण केला. त्यांनी कामगार व किसान संघटनेकडे १९४८ ते १९५० च्या दरम्यान विशेष लक्ष दिले. १९७० मध्ये त्यांनी बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात दौरा काढून तेथील नक्षलवाद्यांचे हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अशा या महान समाजवादी नेत्याचे ८ ऑक्टोबर १९७९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -