घरक्राइमधक्कादायक! अमरावतीत गरीबीला कंटाळून १७ वर्षीय मुलीने घेतला गळफास

धक्कादायक! अमरावतीत गरीबीला कंटाळून १७ वर्षीय मुलीने घेतला गळफास

Subscribe

माझे आई वडिल माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मी देखील त्यांच्यावर तितकेच प्रेम करते पण माझे ओझे त्यांच्यावर नको म्हणून मी आत्महत्या करते,असे सुसाइट नोटमध्ये लिहिले

अमरावतीतून एक धक्कादायक माहिती घटना समोर आली आहे. गरिबीला कंटाळून अमरावतीत १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुटुंबियांच्या नावाने सुसाइट लिहून मुलीने आत्महत्या केली. घरची परिस्थिती अत्यंत हालाकिची आहे. माझ्या आई वडिलांना माझे ओझे होऊ नये यासाठी मी माझे आयुष्य संपवत असल्याचे मुलीने सुसाइट नोटमध्ये लिहिले होते. सेजल गोपाल जाधव असे १७ वर्षीय मुलीचे नाव असून अमरावतीतील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशन परिसरात छीदवाडी येथे राहते. २० ऑक्टोबर रोजी तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण परिसरात सेजलच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सेजलने सुसाइट नोटमध्ये गरिबीचे असलेले भयाण वास्तव वाचून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. सेजलने सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे की, मी सेजल गोपाल जाधव, आत्महत्या करणार आहे. माझ्या घरची परिस्थिती खूप गरीब आहे. माझे घर देखील फार छोटे आहे. आमच्या घरात मी आणि माझी दोन भांवडे आहेत. माझे आई वडिल मला कर्ज काढून शिवकत आहेत. मागील तीन वर्षात शेतातून आम्हाला फार कमी उत्पन्न आले आहे. माझे आई बाबा फार कष्ट करतात. मी इयत्ता बारावीत शिकते. माझ्या शिक्षणासाठी माझ्या बहिणीने शाळा सोडली. ती माझ्यासाठी कामाला जाते. ही गोष्ट माझ्या मनात फार घर करुन आहे. म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे सेजलने म्हटले आहे.

- Advertisement -

 

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आलेल्या कोरोना आणि अवकाळी पावसाने राज्यातील शेकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला. आर्थिक उत्पन्न नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली या परिस्थितीची सेजलच्या आत्महत्येने पुन्हा एकदा जाणीव करुन दिली. घरच्या परिस्थितीमुळे आम्ही हवालदिन झालो आहोत. माझे आई वडिल माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मी देखील त्यांच्यावर तितकेच प्रेम करते पण माझे ओझे त्यांच्यावर नको म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे सेजनले सुसाइट नोटमध्ये म्हटले आहे.  तसेच मी अनेक दिवसांपासून डिप्रेशन मध्ये आहे. मला माझ्या आजीची फार आठवण येत आहे. लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडे राहत होतो. माझ्या अँडमिशसाठी फार पैसे लागणार आहेत. मी पास नापास होण्याच्या टेन्शनमुळे माझा जीव संपवते असे सुसाइट नोटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बायकोला मारहाण केल्याने तरुणाचा काढला काटा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -