घरक्रीडाT20 World Cup 2021: Ind vs Pak शेवटच्या पाच सामन्यातील मॅन ऑफ...

T20 World Cup 2021: Ind vs Pak शेवटच्या पाच सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कोण ?

Subscribe
यंदाच्या टी 20 विश्वचषकामध्ये भारत-विरूध्द पाकिस्तान हा सुपर सामना रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे. दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. आतापर्यंतच्या टी २० विश्वचषकाच्या इतिहासात 5 वेळा दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडले होते. आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये दोन्ही संघात सहाव्यांदा सामना होणार आहे.  पाकिस्तान क्रिकेट संघाचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत पाचही सामन्यात भारतासमोर त्यांची कामगिरी ही सर्वच स्तरातून खराब राहिली आहे.
दोन्ही संघ आतापर्यंत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी २० सामन्यांमध्ये आठ वेळा आमने सामने आले आहेत. यातील पहिला सामना २००७ च्या विश्वचषकात झाला होता, तेव्हापासून आतापर्यंतच्या १४ वर्षाच्या कालावधीत ह्या दोन्ही संघात फक्त ८ वेळा लढत झाली आहे. भारत पाकिस्तान मध्ये झालेल्या शेवटच्या ५ सामन्यांकडे बघितलं तर त्या पाचही सामन्यांत पाकिस्तानचा पराभव झाला आहे. पाकिस्तानला भारताविरूध्द  केवळ एकच सामना जिंकता आला आहे, तो सामना २०१२-१३ मध्ये बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर झाला होता. ह्या सामन्याचा अपवाद वगळता एकही सामन्यावर पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही.

कसा आहे गेल्या पाच वर्षातील रेकॉर्ड 

विराट कोहली, टी ट्वेंटी विश्वकप २०१६, कोलकत्ता 

टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये शेवटचा सामना साल २०१६ रोजी कोलकत्ताच्या इडेन गार्डन्सवर झाला होता. पावसामुळे त्या सामन्यात व्यत्यय आला होता, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १८ षटकांत ५ बाद ११८ धावा बनवल्या होत्या. बदल्यात भारतीय संघाने या धावांचे आव्हान १५.५ षटकांत विराट कोहलीच्या ३७ चेंडूत ५५ नाबाद खेळीच्या बदल्यात पूर्ण केले. विराट कोहलीच्या या शानदार खेळीच्या बदल्यात त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.

विराट कोहली, एशिया कप २०१६, ढाका

साल २०१६ रोजी एशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ अवघ्या ८३ धावांवर ऑल आउट झाला. अशातच धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने ५१ चेंडूत ४९ धावांची खेळी खेळून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. ह्या सावध खेळीच्या बदल्यात कोहलीला सामनावीर म्हणून घोषित केले.

अमित मिश्रा. टी ट्वेंटी विश्वकप, २०१४, ढाका

साल २०१४ मध्ये ढाका येथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान मधील सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १३० धावा बनवल्या. भारताकडून सर्वात जास्त २ बळी फिरकीपट्टू अमित मिश्राने घेतले. बदल्यात विराट कोहलीच्या ३६, धवनच्या ३०, आणि रैनाच्या ३५ धावांच्या जोरावर भारतीय संघाने १३१ धावांचे आव्हान सहजरित्या पार केले. अमित मिश्राच्या शानदार गोलंदाजीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित केले, त्याने ४ षटकांत २२ धावा देऊन २ बळी घेतले होते.

विराट कोहली, टी ट्वेंटी विश्वकप, २०१२, कोलंबो

साल २०१२ मध्ये श्रीलंकेच्या मेजबानीत झालेल्या भारत विरूध्द पाकिस्तानच्या सामन्यात भारताचा विजय झाला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी संघ १९.४ षटकांत १३० धावांवर ऑलआउट झाला. धावांचा पाठलाग करताना
विराट कोहलीने ६१ चेंडूत ७८ धावांची आक्रमक पारी खेळून संघाला विजय मिळवून दिला, बदल्यात कोहलीला मॅन ऑफ द मॅच घोषित केले.

युवराज सिंह, भारत पाकिस्तान टी ट्वेंटी मालिका, २०१२

युवराज सिंहच्या ३६ चेंडूत ७२ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या बदल्यात भारतीय संघाने ५ बाद १९२ धावा उभारल्या. युवराजच्या आक्रमक खेळीमुळे भारताची सामन्यावर चांगली पकड झाली होती. बदल्यात पाकिस्तानी संघाने ७ बाद १८१ धावा केल्या. आणि भारताने सामन्यावर विजय मिळवला. युवराज सिंहच्या शानदार खेळीमुळे त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -