घरमनोरंजनAnushka Sharma : अनुष्काची दुसरी डिलिव्हरी लंडनमध्ये करण्याचे मोठे कारण आले समोर

Anushka Sharma : अनुष्काची दुसरी डिलिव्हरी लंडनमध्ये करण्याचे मोठे कारण आले समोर

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने लंडनमध्ये 15 फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला. विराट आणि अनुष्का हे त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी गेल्या महिन्याभरापासून लंडनमध्ये होते. विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या आनंदाच्या बातमीनंतर दोघांच्या चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. मात्र अनुष्का शर्माने मुंबईत मुलाला जन्म न देता लंडनमध्ये का दिला? असा प्रश्न दोघांच्या चाहत्यांना पडला होता. याचे उत्तर आता समोर आले आहे. (A big reason for Anushka Sharmas second delivery in London has come to light)

हेही वाचा – CJI : मला कोरोना झाला तेव्हा, पंतप्रधान मोदींचा फोन आला…; सरन्यायाधीशांनी सांगितली आठवण

- Advertisement -

अनुष्काच्या दुसऱ्या गरोदरपणापासून ते मुलाच्या जन्मापर्यंत विराट-अनुष्काने गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली होती. पण आता मुलाच्या जन्मानंतर लंडनमधून विराटचा फोटो समोर आला आहे. हा फोटो त्याच्या फॅन क्लबने शेअर केला आहे. विराट लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसला. यानंतर आता एक अहवाल समोर आला की, विराट आणि अनुष्काला गोपनीयता हवी होती. यापूर्वी भारतीय माध्यमांनी वारंवार नकार देऊनही विराट आणि अनुष्काची पहिली मुलगी वामिकाचा फोटो अनेक वेळा काढला होता. त्यानंतर वामिकाचा फोटा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

- Advertisement -

विराट आणि अनुष्काला दुसऱ्या बाळाबाबत प्रायव्हसीची बाळगायची होती, यासाठी त्यांनी मुंबईपासून दूर लंडनची निवड केली. यासाठीच दोघेही गेल्या महिन्याभरापासून लंडनमध्ये होते. दुसरे कारण असेही समोर येते की, दोघांना यूकेला शिफ्ट व्हायचे आहे. त्यांना त्याठिकाणी आपले दुसरे घर बनवायचे आहे. यासाठी त्यांना तिथले नागरिकत्व हवे आहे. म्हणून विराट आणि अनुष्काने लंडनमध्ये दुसऱ्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विराटने मुलाच्या जन्मानंतर प्रायव्हसीची विनंती केली होती.

हेही वाचा – Thackeray Group : ठाकरे गटाच्या अडचणीत पुन्हा वाढ; आता देसाईंच्या पीएविरोधात ईडीकडून गुन्हा

विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘मी तुम्हा सर्वांना आनंदाने सांगू इच्छितो की, 15 फेब्रुवारी रोजी आमच्या घरी एक छोटा पाहुणा आणि वामिकाचा लहान भाऊ आला आहे. या क्षणी आम्हाला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रार्थना हवी आहे. आम्ही तुम्हाला आमच्या प्रायव्हसीची विनंती करतो, असे विराटने म्हटले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -