घरमनोरंजन'आझाद'नंतर आता आमिरने बदलली वेशभूषा

‘आझाद’नंतर आता आमिरने बदलली वेशभूषा

Subscribe

थग्स ऑफ हिंदूस्तान नंतर आता आझाद म्हणजेच अभिनेता आमिर खान वेगळ्या वेशभूषेत समोर आला आहे. यावेळी लहान मुलांसोबत पार्टी करतानाचे फोटो आमिरने ट्विटरवरून शेअर केले आहेत.

बॉलिवूड परफेक्शनीस्ट आमिर खान आपल्या विविध वेशभूषेंसाठी ओळखला जातो. चित्रपटांमध्ये आपल्या भूमिका खऱ्या वाटाव्या म्हणून तो प्रयत्न करतो. आमिर पडद्यावर जसा भूमिका साकारतो तसाच आपल्या खाजगी जीवनातही विविध कार्यक्रमासाठी वेगळ्या वेशभूषेत दिसतो. नुकत्याच एका लहान मुलाच्या कार्यक्रमामध्ये आमिरने कार्टून अॅस्टरिक्सच्या भूमिकेची वेशभूषा केली होती. अॅस्टरिक्स एक कार्टून आहे जे १९५९ मध्ये प्रकाशित झाले होते. त्यावेळी हे कार्टून कॉमिक्स आणि टीव्हीवर बघितल्या जात होते. आमिर बरोबरच त्याची पत्नी किरण रावही वेगळ्या वेशभूषेत दिसून आली. या पर्टीचे फोटो आमिरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यानंतर आमिरच्या फॅन्सने या फोटोंवर कमेंट्सचा भडीमार केला. आमिर आणि किरण राव या पार्टीमध्ये लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसून आले.

- Advertisement -

- Advertisement -

‘थग्स ऑफ हिंदूस्तान’ मध्ये साकारली होती आझादची भूमिका

अभिनेता आमिर खान नुकताच थग्स ऑफ हिंदूस्तान हा चित्रपट केला होता. या चित्रपटात आमिरने ‘आझाद’ ची भूमिका साकारली होती. चित्रपटात आमिर सोबत महानायक अमिताभ बच्चन, फातिमा साना शेख आणि कॅटरीना कैफ हीने भूमिका साकरल्या होत्या. चित्रपटाने दोन आठवड्यातच ३०० कोटी कमावले होते. आमीरचा आगामी चित्रपट फिल्म निर्माते आणि टी सिरिजचे मालक गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र अद्याप स्क्रीप्ट पूर्ण न झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -