घरमनोरंजनअमृताचे बोल

अमृताचे बोल

Subscribe

मोबाईल जेव्हा हातात आला तेव्हा समोरच्या माणसाशी बोलण्याइतपत त्याचा उपयोग होईल असे बोलले जात होते. त्यातही मोठा आनंद होता, पण हा आनंद आणखीन द्विगुणीत होईल असे वाटलेही नव्हते. विज्ञानाने इतक्या झपाट्याने प्रगती केली की ऑनस्क्रिन संवादही साधता येतो. वॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणी संवादही साधू शकतात. यू-ट्यूब, इन्स्टाग्राम या आणखीन सुविधा आल्याने जनसंपर्कही वाढलेला आहे. नवीन अ‍ॅप येण्याचा अवकाश की तरुणांकडून त्याचे जबरदस्त स्वागत होते. अभिनेत्री अमृता खानविलकर सतत या निमित्ताने काही पावले पुढे राहिलेली आहे.

तिच्या जीवनात कोणतीही गोष्ट घडो, त्यात आनंद आहे म्हटल्यानंतर लागलीच सोशल नेटवर्कच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवते. एक गुड न्यूज आहे असे सांगून तिने चर्चा घडवली आहेच, आता टिक टॉक या नव्या अ‍ॅपचा वापर करून अमृताचे बोल ती आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवू लागलेली आहे. याचाच फायदा घेऊन महिलांना ब्यूटी-टीप्स देण्याची तिने तयारी केलेली आहे. काही सिक्रेट्स ती मोकळेपणाने सांगणार आहे. त्यासाठी महिला दिन हे निमित्त निवडलेले आहे. सात दिवस ती सुसंवाद साधणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -