घरमनोरंजनफरहान अख्तरचा येतोय 'तुफान' चित्रपट

फरहान अख्तरचा येतोय ‘तुफान’ चित्रपट

Subscribe

तुफान या चित्रपटात फरहान बॉक्सरच्या भूमिकेत आहे.

बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरचा तुफान चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहाऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या तारीखेची घोषणा अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने सोशलमिडियावर केली आहे. २१ मे ला तुफान हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. याचबरोबरच ‘या उन्हाळ्यासाठी हवामान अंदाज, एपिक ब्लॉकबस्टर तुफान येत आहे, असे कॅप्शन अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने पोस्टर शेअर करत लिहिले आहे. तुफान या चित्रपटात फरहान बॉक्सरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे, यापूर्वी त्यांनी फरहान सोबत ‘भाग मिल्खा भाग’ यासारख्या दर्जेदार चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती राकेश आणि फरहान यांनी केली आहे.

- Advertisement -

या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत फरहान अख्तरने , तुफान येतोय…१२ मार्चला प्राइम व्हिडिओवर टीजर येणार आहे. हा चित्रपट अगोदर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, मात्र कोरोना महामारीमुळे याचे प्रदर्शन ओटीटी प्लॅटफॉर्मवरच होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रियांकाशी लग्न करण्याचे निकने दिले मजेशीर कारण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -