घरमनोरंजनएफआयआर फेम कविताचा फेसबुकला बाय बाय!

एफआयआर फेम कविताचा फेसबुकला बाय बाय!

Subscribe

एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिकने आपलं फेसबुक अकाऊंट बंद केल आहे. फेसबुकवर मोठी पोस्ट लिहून तिने आपलं फेसबुक अकाऊंट बंद केलं आहे.

एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिकने आपलं फेसबुक अकाऊंट बंद केलं आहे. फेसबुकवर मोठी पोस्ट लिहून तिने आपलं फेसबुक अकाऊंट बंद केलं आहे. ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक अशा सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असणाऱ्या कविताने फेसबुक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कविता कौशिक तिच्या या फेसबुक पोस्टमध्ये म्हणते, ‘फेसबुक हे वेळ खाणारं माध्यम आहे. त्यामुळे माझ्या मित्र मंडळींनी, नातेवाईकांनी मला थेट संपर्क साधावा. मी माझं फेसबुक अकाऊंट बंद करत आहे.

- Advertisement -

पोस्टमध्ये कविता पुढे लिहिते..‘फेसबुक हे वेळकाढू माध्यम आहे. जिथे तुमचे मित्र तुमच्याशीच भांडतात. इथे सगळेच दुसऱ्यांकडे वाईट नजरेने बघतात. खास करून एखाद्या अभिनेत्रीला. मी गेल्या अनेक वर्षांपासून या गोष्टीमुळे हैराण आहे. आता असं वाटतं की इथे सगळ्यांना कायम अटेन्शन हवं असतं. अशी लोकं मला कायम कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता मी इथे आणखी राहू शकत नाही. मी या प्लॅटफॉर्मसाठी योग्य नाहीये. मी इथून गेल्यानंतर लोकं माझ्याबद्दल काहीही बोलू शकतात. खरंतर हे मी खूप आधी करायला हवं होतं.’

कविताने फेसबुक जरी सोडले असले तरी ती अजून इन्स्टाग्राम, ट्विटरवर अक्टिव्ह आहे. त्यामुळे या दोन माध्यमातून तिचे चाहते तिच्याशी कनेक्ट राहू शकणार आहेत. सध्या कविता पंजाबी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -