घरमुंबईदहीहंडी उत्सवावर समाजकंटकांच्या दहशतीचे सावट

दहीहंडी उत्सवावर समाजकंटकांच्या दहशतीचे सावट

Subscribe

सोमवारी होणार्‍या दहीहंडी उस्तवात समाजकंटकांच्या माध्यमातून दोन गटात पुन्हा तेढ निर्माण केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. नवी मुंबईत सलोखा कायम राहावा म्हणून अभिनेते नाना पाटेकर आवाहन करण्यासाठी येणार असल्याची माहिती यावेळी परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी दिली.

राज्यात झालेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद नवी मुंबई शहरात सर्वाधिक उमटले. आंदोलनानंतर शहरात आगरी विरुद्ध मराठा असे गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटात समन्वय घडवून आणण्यासाठी पोलीस अतोनात प्रयत्न करत आहेत. पण या दोन्ही गटांना समाजकंटकांची भीती आहे. सोमवारी होणार्‍या दहीहंडी उस्तवात समाजकंटकांच्या माध्यमातून दोन गटात पुन्हा तेढ निर्माण केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत. त्यांनी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. नवी मुंबईत सलोखा कायम राहावा म्हणून अभिनेते नाना पाटेकर आवाहन करण्यासाठी येणार असल्याची माहिती यावेळी परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी दिली.

मराठा आंदोलनात जसा वाद उफळला होता, तसा सणांच्या काळात पुन्हा उफाळू नये म्हणून परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात समन्वय बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी नागरिकही उपस्थित होते. नवी मुंबईत सलोखा कायम राहावा म्हणून अभिनेते नाना पाटेकर आवाहन करण्यासाठी येणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. नवी मुंबई शहरात मराठा आंदोलानंतर आगरी विरुद्ध मराठा असा तेढ निर्माण झाला होता. सुमारे ५८ पोलीस अधिकारी-कर्मचारी, १८ नागरिक गंभीर जखमी झाले होते. २०० पेक्षा अधिक वाहनांची मोडतोड झाली होती. राहुल तोडकर या तरुणाची हत्या झाली आणि त्या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर ही समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित नेत्यांनाही पाठारे यांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले. यावेळी बैठकीला माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, मराठा समाज समन्वयक अंकुश कदम, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, नगरसेवक किशोर पाटकर, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, काँग्रेस नेते रमाकांत म्हात्रे, दशरथ भगत,माजी मेत्री शशिकांत शिंदे आदी सर्व पक्षिय नेते उपस्थित होते.

तीन ठिकाणी दहीहंडी रद्द
नवी मुंबईतील वातावरण अजूनही धुमसत असून त्याला पुन्हा गालबोट लागून शांततेचा भंग होऊ नये म्हणून भाजप नेते वैभव नाईक यांच्यामार्फत आयोजित केली जाणारी सर्वात मोठी दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. कोपरखैरणे येथील गंगाई मित्रमंडळ आणि ऐरोलीमधील तरुण मित्रमंडळ यांनीही आपले उत्सव रद्द केले आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली. तिन्ही आयोजकांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

‘शत्रुराष्ट्रे दंगलींचा गैरफायदा घेऊन हिंसाचार भडकवण्यासाठी समाजमाध्यमांचा गैरवापर करतात. लोकसंख्येच्या २ टक्के गुन्हेगार समाजात आहेत. ते अशा कृत्यांत ओढले जातात. त्यामुळे नको ते प्रकार घडत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो. दोन गटात झालेले तेढ पाहता त्यांच्यात समन्वय घडवून आणण्यासाठी लवकरच मराठी अभिनेते नाना पाटेकर यांना बोलावण्यात येईल.
-सुधाकर पाठारे , उपायुक्त,नवी मुंबई पोलीस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -