घरमनोरंजनदिलीप कुमार यांना पाकिस्तान कडून सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळाल्यानंतर,महाराष्ट्रात तापले होते राजकारण

दिलीप कुमार यांना पाकिस्तान कडून सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळाल्यानंतर,महाराष्ट्रात तापले होते राजकारण

Subscribe

दिलीप कुमार यांना 1998 साली पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान 'निशान-ए-इम्तियाज' दिला होता.

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे आज सकाळी 7.30वाजता निधन झाले असून ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. बॉलिवूड विश्वात 50 च्या दशकात आपली कारकिर्द घडवणारा रसिकप्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दिग्गज अभिनेता हरपल्याने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार यांच्या अभिनयाची जादू भारतापुरतीच मर्यादित नसून अनेक देशामध्ये त्यांच्या अभिनयाचे कौतूक केलं जात असे. भारत सरकारने त्यांना अनेक नामी पुरस्काराने गौरवले होते. तसेच पाकिस्तान सरकारने देखील दिलीप कुमार यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ हा पुरस्कार प्रदान केला होता. दिलीप कुमार यांना पाकिस्तानने पुरस्कार दिल्यानंतर भारतात राजकारण चांगलेच तापले होते.
पाकिस्तान सरकारद्वारे दिलीप कुमार यांना 1998 साली पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ दिला होता. यानंतर त्या काळी महाराष्ट्रात शिनसेना पार्टीने या पुरस्काराबद्दल आपत्ती दर्शवली होती. शिवसेनाने दिलीप कुमार यांनी स्वीकारलेल्या पुरस्काराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत दिलीप कुमार यांच्या देशभक्तीवर अनेकदा संशय व्यक्त केला होता. अशातच 1999 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या सल्यानंतर दिलीप कुमार यांनी पुरस्कार स्वत:जवळच बाळगण्याचे ठरवले होते. आजतागयत दिलीप कुमार यांना अनेक नामी पुरस्कार मिळाले आहेत.

पद्म भूषण- 1991
दादा साहेब फाळके अवॉर्ड- 1994
वद्म विभूषण- 2015
NTR नेशनल अवॉर्ड (आंध्र प्रदेश सरकार)- 1997

- Advertisement -


हे हि वाचा – Dilip Kumar Death: कारगिल युद्धाच्या वेळी दिलीप कुमार यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फटकारले होते,म्हणाले…



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -