घरमनोरंजनरश्मिका, काजोलनंतर आलियाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल

रश्मिका, काजोलनंतर आलियाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि काजोलचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामुळे अनेक कलाकारांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान, या दोन्ही अभिनेत्रीनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा देखील असाच एक फेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया अश्लील पद्धतीने बसलेली दिसत आहे.

आलियाचा डीपफेक व्हायरल

सध्या तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करुन अनेक डीपफेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केले जात आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना आणि काजोलचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आलियाचा देखील अशाच पद्धतीचा अश्लील फोटो समोर आला आहे.

- Advertisement -

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका मुलीने निळ्या फुलांचा ड्रेस घातलेला दिसत आहे. यामध्ये ती कॅमेऱ्याकडे बघत अश्लील हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडीओली एडिट करुन त्या मुलीच्या जागी आलियाचा चेहरा दाखवण्यात आला आहे, परंतु, नीट पाहिल्यावर हा आलिया नसल्याचं स्पष्ट होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओबाबत अनेक कमेंट्स केल्या जात आहेत.

‘या’ चित्रपटात दिसणार आलिया

आलिया येत्या काही दिवसांमध्ये तिच्या आगामी जिगरा चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शुटिंग सुरु आहे. यानंतर ती जी ले जरा या चित्रपटाध्ये देखील दिसेल. या चित्रपटात आलियासोबत कतरिना कैफ आणि प्रियंका देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.


हेही वाचा : जया-अमिताभ बच्चन कुटुंबातील मोठी बातमी, प्रतीक्षा बंगला मुलगी श्वेताला दिला भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -