घरमनोरंजनRRR ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; आनंदात Ram Charan ने वाटली सोन्याची नाणी...

RRR ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; आनंदात Ram Charan ने वाटली सोन्याची नाणी अन् मिठाई

Subscribe

SS राजामौलीचा RRR चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यापासून रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाने 10 दिवसांत 1000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर दररोज सुमारे 100 कोटींची कमाई करत आहे. यामुळे चित्रपटाचा मुख्य कलाकार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचे जगभरातून कौतुक होतेय. चित्रपटाच्या यशानंतर ‘अल्लुरी सीताराम राजू’ ची भूमिका साकारणारा अभिनेता सर्वाधिक आनंदी दिसून येतोय. या आनंदात त्याने ‘RRR’ टीम्या अनेक सदस्यांना चक्क सोन्याची नाणी भेट म्हणून दिली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरणने ‘RRR युनिटच्या क्रू आणि इतर सहाय्यकांना 10-10 ग्रॅम सोन्याचं नाणं भेट दिली आहेत. मुंबईला रवाना होण्यापूर्वी अभिनेत्याने राजामौली दिग्दर्शित चित्रपटात काम करणाऱ्या सुमारे 35 टेक्नोशियनला सोन्याचे क्वाइंट भेट दिले आहे. चित्रपटाच्या (RRR movie) निर्मितीमध्ये काम करणारे विविध विभागांचे प्रमुख जसे की, कॅमेरा सहाय्यक (cinematography), निर्मिती व्यवस्थापक, (Production Manager) , लेखापाल, (accountant), स्थिर छायाचित्रकार, (stationary photographer), दिग्दर्शन विभाग (direction Department) आणि इतर अनेक विभागांमधील लोकांना ही सोन्याची नाणी देण्यात आली आहेत.

- Advertisement -


राम चरणने दिलेल सोन्याचं नाणं आहे स्पेशल 

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राम चरणने टीमच्या क्रू मेंबर्सच्या प्रमुखांना नाश्त्यासाठी बोलावले यावेळी त्याने सर्वांनी दिलेल्या उत्तम सहकार्याबद्दल त्यांना आदरपूर्वक भेटवस्तू  दिली. अभिनेत्याने यावेळी प्रत्येकाला मिठाईचा एक बॉक्स आणि तोला सोन्याचे नाणे भेट दिले आहे. या सोन्याच्या नाण्याच्या एका बाजूला आरआरआर लिहिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला राम चरणचे नाव लिहिलेले आहे, जे या चित्रपटाच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सदस्यांसाठी एक संस्मरणीय भेट आहे. राम चरणच्या मनाचा मोठेपणा नेहमीच चर्चेत असतो आणि या प्रसंगातूनही त्याने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by RRR Movie (@rrrmovie)

RRR बनवण्यात हजारो लोकांचे योगदान 

RRR या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादस्थित रामूजी फिल्म सिटीसह इतर अनेक ठिकाणी करण्यात आले आहे. ज्यामध्ये मोठ्या संख्येने क्रू मेंबर्सनी योगदान दिले आहे. अॅक्शन ड्रामा चित्रपटाने सिनेप्रेमींना खूप प्रभावित केले आहे, दरम्यान बाहुबली फ्रँचायझीच्या जबरदस्त यशानंतर, राजामौली आता RRR द्वारे जगभरात लोकप्रिय होत आहेत. पण एवढा मोठा चित्रपट बनवण्यासाठी एक-दोन नव्हे तर हजारो लोकांची मेहनत असते.


Rashmika Mandana Birthday : …आणि ‘नॅशनल क्रश’ श्रीवल्लीचा साखरपुडा तुटला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -