घरमनोरंजनAjay Devgn नव्या भूमिकेत ; चित्रपटाच्या रिलीज डेटची केली घोषणा

Ajay Devgn नव्या भूमिकेत ; चित्रपटाच्या रिलीज डेटची केली घोषणा

Subscribe

अजय देवगन आता लवकरंच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करणार आहे. भोला हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल. या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा एका दमदार पोलीसा ऑफिसरची भूमिका साकरताना दिसणार आहे.

बॉलिवूडचा दमदार अभिनेता अजय देवगनने त्याच्या नव्या कोऱ्या आगामी चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. या आगमी चित्रपटाचे नाव ‘भोला’ हे असून हा चित्रपट ३० मार्च २०२३ या दिवशी रिलीज होणार आहे.

हि अभिनेत्री असेल मुख्य भूमिकेत

- Advertisement -


अजय देवगनने या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली. शिवाय त्याच्यासोबत या चित्रपटात तब्बू मुख्य भूमिका साकारणार असल्याची माहिती सुद्धा दिली. खास गोष्ट अशी की, तब्बू या पूर्वीही अनेकदा अजय देवगनसोबत अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली होती. त्यामुळे आता पुन्हा त्यांचे चाहते ही जोडी पाहण्यास उत्सुक आहेत.

‘कैथी’ या साउथ चित्रपटाचा आहे रीमेक

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

- Advertisement -

सूत्रांच्या माहितीनुसार अजय देवगन आता लवकरंच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करणार आहे. भोला हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल. या चित्रपटात अजय देवगन पुन्हा एकदा एका दमदार पोलीस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाला अजय देवगन, टी सीरीज फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट आणि ड्रिम वॉरियर पिक्चर्स यांच्या सोबत चित्रपट प्रोड्यूस करत आहे.

चुलतभाऊ करत आहे दिग्दर्शन
या चित्रपटाची खास गोष्ट अशी आहे की, अजय देवगनच्या या चित्रपटाचे त्यांचा नात्यातला भाऊ धर्मेंद्र शर्मा दिग्दर्शन करणार आहे. भोला या चित्रपटाच्या शूटिंगची सुरूवात या वर्षी जानेवारीमध्ये करण्यात आली होती. अजय देवगनचा ‘भोला’ चित्रपट तमिळ सुपरहिट चित्रपट कैथीचा रिमेक असेल, ‘कैथी’ चित्रपट २०१९ रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटात साउथचा अभिनेता कार्ती याने मुख्य भूमिका साकरली होती.

Jayeshbhai Jordaar Trailer : रणवीर सिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -