घरमनोरंजनरोहित शेट्टीच्या 'इंडियन पुलिस फोर्स' वेब सीरिजमध्ये हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ वेब सीरिजमध्ये हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका

Subscribe

या वेबसीरिजचे नाव 'इंडियन पुलिस फोर्स' हे असून ही एक काल्पनिक सीरिज आहे. मंगळवारी यासंबंधीत माहिती त्यांनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

सिंघम , सिंबा आणि सूर्यवंशी या पोलीसांवर आधारित असलेल्या धमाकेदार चित्रपटानंतर आता रोहित शेट्टी लवकरंच अशीच एक नवीन वेबसीरिज ओटीटी प्लाटफॉर्मवर घेऊन येत आहे. या वेबसीरिजचे नाव ‘इंडियन पुलिस फोर्स’ हे असून ही एक काल्पनिक सीरिज आहे. मंगळवारी यासंबंधी माहिती त्यांनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर सांगितले की,  या वेबसीरिजसाठी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांनी या वेबसीरिज मधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यात सिद्धार्थ मल्होत्रा पोलीसाच्या गणवेशात दिसून येत आहे.

आपल्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, “कारवाई उद्या सकाळी ११ वाजता सुरू होईल!” शिवाय हा फोटो रोहित शेट्टीसोबतचं सिद्धार्थ मल्होत्राने सुद्धा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलंय की, ‘रोहित शेट्टीचे पोलिस सकाळी ११ वाजता डिजिटल होतील!’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

- Advertisement -

सिद्धार्थ मल्होत्राचा हो फोटो शेअर होताचं करण जौहरने यावर प्रतिक्रिया दिली. तसेच सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्यांनी सुद्धा त्याला चित्रपटाबाबत शुभेच्छा दिल्या. एकजण कमेंटमध्ये म्हणाला की, ‘सिद्धार्थ गणवेशात जा आणि धमाल उडवून टाक’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

- Advertisement -

याआधी सुद्धा नोव्हेंबर २०२१ मध्ये रोहित शेट्टीने अजून एक पोलिसांवर आधारित ऍक्शन ड्रामा वेबसीरिज करणार असल्याचे सांगितले होते. तसेच आता रोहित शेट्टी या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पर्दापण करणार आहे. ही एका पोलीसावर आधारित सीरीज असेल.तसेच ही वेबसीरिज ८ भागांमध्ये विभागलेली असेल.

Jayeshbhai Jordaar Trailer : रणवीर सिंहच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -