घरमनोरंजन'नवऱ्यासोबत फोटो शेअर करत नाही?' अमृता खानविलकर ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली...

‘नवऱ्यासोबत फोटो शेअर करत नाही?’ अमृता खानविलकर ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली…

Subscribe

अभिनेत्री अमृता खानविलकरनं केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृतानं नाटक, हिंदी व मराठी मालिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. अमृता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमृताचं लग्न अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत झालं असून ती त्याच्यासोबत सोशल मीडियावर जास्त फोटो शेअर करत नाही. यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर अमृता खानविलकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.

अमृतानं खानविलकरने झूम ला दिलेल्या मुलाखतीत आयुष्याला खासगी ठेवण्यावर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय तिनं सांगितलं की सोशल मीडियावर तिला फक्त तिचं काम दाखवायचं आहे. अमृता म्हणाली, “मला असं वाटतं की आमचे चाहते हे आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहे. काही लोकांना तुम्ही आवडता आणि काही लोकांना नाही. जो पर्यंत ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळा-ढवळ करत नाही तोपर्यंत सगळं काही ठीक आहे. ते माझ्या कामाबद्दल आणि मी इन्स्टाग्रामवर जे शेअर करते त्याविषयी बोलतात, तो पर्यंत सगळं ठीक आहे. कधीतरी त्यांना आवडतं, कधी नाही आवडत. पण ते जेव्हा मला, माझ्या कुटुंबाला किंवा मला आणि हिमांशुला ट्रोल करणं सुरु करतात, तेव्हा ती एक समस्या असते. मी त्याच्याबद्दल काही पोस्ट करत नाही, कारण मला त्यांना या सगळ्यापासून लांब सुरक्षित ठेवायचं आहे. माझ्यासाठी त्यांच्याविषयी सगळं काही शेअर करण्यापेक्षा त्यांचे रक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे, त्याचं कारण म्हणजे ते या इंडस्ट्रीतून नाही. कोणत्या प्रकारे होणाऱ्या ट्रोलिंगला आणि द्वेषासाठी ते पात्र नाही, कारण या सगळ्यामुळे त्यांना दु: ख होऊ शकते. मी नेहमीच याची काळजी घेतली, घेते आणि घेत राहीन.”

- Advertisement -

अमृता म्हणाली की “मी हिमांशू आणि माझे जास्त फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही त्यामुळे मला ट्रोल करण्यात आले आहे. पण मी माझ्या आई-वडिलांकडे पाहते, जे गेल्या 45 वर्षांपासून आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत, त्या दोघांचे फेसबूक किंवा इन्स्टाग्रामवर एकही फोटो नाही. मला तेच करायचं आहे. मी जुन्या विचारसरणीची आहे. मी आणि हिमांशू एकमेकांना तेव्हा पासून ओळखतो, जेव्हा इन्स्टाग्राम नव्हतंच. 2004 पासून एकमेकांना आम्ही ओळखतोय, तेव्हा आम्ही कॅमेऱ्यात फोटो काढायचो. आम्हाला एकमेकांना सुरक्षित ठेवायचं आहे आणि एकमेकांची ओळख जपायची आहे. माझं सोशल मीडिया हे जास्त माझ्या कामाबद्दल आणि मी काय करते या संबंधीत आहे.”

________________________________________________________________________

- Advertisement -

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -