घरमनोरंजनअनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? पोस्टमुळे होतेय चर्चा

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई? पोस्टमुळे होतेय चर्चा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली अनेकदा त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात. अशातच मागील काही दिवसांपासून हे दोघेही पुन्हा एकदा आई-वडील होणार असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत या दोघांनी कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. पण नुकतीच अनुष्काने शेअर केलेली एक पोस्ट पाहून नक्कीच अनुष्का प्रेग्नेंट असल्याचं म्हटलं जात आहे.

अनुष्काच्या नव्या पोस्टमुळे होतेय चर्चा

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर प्रेग्नेंसी किटची जाहिरात पोस्ट केली आहे. ज्यावरुन ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावत आहेत. शिवाय अनेकजण अनुष्काल शुभेच्छा देखील देताना दिसत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मागील काही दिवसांपर्वी देखील अनुष्काच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरु होती. त्यावेळी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला एका मॅटरनिटी क्लिनिकबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी त्यांनी पापाराझींना हे फोटो शेअर न करण्याची विनंती केली. तसंच लवकरच ते स्वतः ही बातमी जाहीर करतील. असं ते म्हणाले होते.

2021 मध्ये दिला होता मुलीला जन्म

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे आधीच एका मुलीचे पालक आहेत. अनुष्काने जानेवारी 2021 मध्ये त्यांची मुलगी वामिकाला जन्म दिला होता. त्यावेळी देखील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या इंस्टाग्राम फोटोंद्वारे याची घोषणा केली होती.


हेही वाचा : अरबाज खान लवकरच नव्या गर्लफ्रेंडसोबत करणार लग्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -