घरमनोरंजनए.आर. रहमान यांच्या आईचे निधन; भावनिक पोस्ट केली शेअर

ए.आर. रहमान यांच्या आईचे निधन; भावनिक पोस्ट केली शेअर

Subscribe

ए.आर. रहमान यांनी आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिली माहिती

गायक ए.आर. रहमान यांची आई करीमा बेगम यांचे निधन झाले आहे. ए.आर. रहमान यांनी आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत २८ डिसेंबर रोजी आईने जगाचा निरोप घेतला, अशी माहिती दिली. ए.आर. रहमान त्यांच्या आईच्या अगदी जवळ होते आणि प्रत्येक विशेष प्रसंगी ते नेहमीच आपल्या आईची आठवण करताना दिसत होते. अशा परिस्थितीत, आपल्या आईला गमावणे हे त्यांच्यासाठी एक मोठे नुकसान आणि भावनात्मक क्षण आहे.

- Advertisement -

दरम्यान, ए.आर. रहमान यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही त्याच्या आईला श्रद्धांजली वाहिली आहे. करीमा बेगम यांचे नाव कस्तुरी होते, जे नंतर बदलले गेले. त्याच वेळी, गायक रहमान यांनी आपले नाव दिलीप कुमार बदलून एआर रहमान असे बदलले. काही काळापूर्वी चेन्नई टाईम्सशी झालेल्या मुलाखतीत रहमानने आपल्या आईसंदर्भात चर्चा केली होती. यावेळी ते म्हणाले -‘माझ्या आईने मला नाही तर माझ्यातील संगीत, गायनाची कला अधिक ओळखली होती.

ए.आर. रहमान हिंदू परिवारात जन्माला आले. त्यांच्या लहानपणी त्यांचे नाव दिलीप कुमार ठेवण्यात आले होते. ए.आर. रहमान हे ९ वर्षांचे असताना त्यांचे वडील आर के शेखर यांचे निधन झाले. साधारण वयाच्या ११ व्या वर्षी रहमान यांनी त्यांचा मित्र शिवमणीसोबत ‘रहमान बैंड रुट्स’ साठी सिंथेसाइजर वाजवण्याचे कामदेखील केले. रहमान यांनी एका मुलाखतीत असे सांगितले की, ‘जेव्हा मी २३ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या बहिणीची तब्येत खराब झाली, तेव्हा माझ्य़ा पूर्ण परिवारासह ती मुस्लीम धार्मिक स्थळी गेली. तेथे केलेल्या प्रार्थनेनंतर बहिणीची तब्येत पुर्णतः बरी झाली. यानंतर माझ्या कुटुंबाने धर्मांतर केले आणि इस्लामिक धर्म स्वीकारला’

- Advertisement -

१९९१ साली रहमान यांनी चित्रपटांसाठी संगीत देणं सुरू केले. चित्रपट निर्माते मणिरत्नम यांनी आपल्या ‘रोजा’ चित्रपटात त्यांना संगीत देण्याची संधी दिली. हा दक्षिण भारतातील पहिला चित्रपट असून त्यांचे गाणे हिंदीमध्ये डब झाले व सुपरहिट ठरले. रहमान हा पहिला आशियाई गायक आहे ज्याला एकाच वर्षात दोन ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तसेच, त्यांना ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या गाण्यासाठी जगप्रसिद्ध ‘अ‍ॅकॅडमी अवॉर्ड’,बाफ्टा आणि ग्रॅमी पुरस्कार मिळाला. रहमान यांना भारत सरकारच्या वतीने ‘पद्मश्री’ आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -