घरदेश-विदेशनव्या वर्षात प्रवासासाठी लागणार वॅक्सिन पासपोर्ट

नव्या वर्षात प्रवासासाठी लागणार वॅक्सिन पासपोर्ट

Subscribe

जगभरामध्ये सध्या कोरोनाच्या लसीकरणाची मोहीम अनेक देशांमार्फत हाती घेण्यात आली आहे. त्यामुळेच आगामी वर्ष २०२१ मध्ये अनेक गोष्टी सामान्य होतील अशी आशा वर्तवण्यात येत आहे. जगभरात कोरोनाच्या महामारीमुळे आतापर्यंत ८ कोटी लोकांना या विषाणूचे संक्रमण झाले आहे. तर जगभरात एकुण १० लाख ७६ हजार लोकांचा या कोरोनाच्या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. जगभरात एकुणच या विषाणूमुळे लोकांचे आयुष्यमानच बदलून गेले आहे.
सध्याच्या मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसारच नवीन वर्षात म्हणजे २०२१ मध्ये न्यू नॉर्मलच्या यादीत आणखी एका गोष्टीची भर पडणार आहे, ती म्हणजे वॅक्सिन पासपोर्ट (Vaccine Passport) एप्लिकेशनची. सीएनएनने याबाबतचे वृत्त जारी केले आहे. आपल्या मोबाईलमधूनच एप्लिकेशनद्वारे हा एक असा पुरावा असेल ज्यामुळे तुम्हाला कार्यक्रम, कॉन्सर्टच्या ठिकाणी, स्टेडिअम, सिनेमागृहे, कार्यलये तसेच दुसऱ्या देशात जातानाही तुम्ही कोरोना व्हायरससाठी निगेटीव्ह आहात याचा पुरावा सादर करावा लागेल. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मात्र या पासपोर्टची फारशी उपयुक्तता नसेल असेल स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होत असला तरीही नेहमीच दुसऱ्या स्वरूपाच्या संसर्गाचा धोका असेल असे WHO मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

वॅक्सिन पासपोर्ट म्हणजे काय ?

– आपल्या कोविड १९ चाचणीचा अहवाल आणि लसीकरणाबाबतची माहिती ही वेळोवेळी सादर करावी लागणार आहे. काही कंपन्यांकडून किंवा टेक्नॉलॉजी ग्रुपकडून येत्या काळात याबाबतची एप्लिकेशन तयार करण्यात येतील. त्यावेळी या डिजिटल माहितीचा पुरवठा करावा लागणार आहे.

- Advertisement -

– कॉमन पास एप्लिकेशनच्या माध्यमातून युजर्सना आपला वैद्यकीय डेटाची माहिती म्हणजे कोविड १९ चाचणीचा अहवाल, लसीकरणाबाबतचा पुरावा डिजिटल पुराव्यासाठी अपलोड करावा लागणार आहे. क्यूआर कोडच्या स्वरूपात पास जनरेट करावा लागणार असून यंत्रणांना तो वेळोवेळी दाखवावा लागणार आहे. कॉमन ट्रस्ट नेटवर्कसाठीचा पुढाकार हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या नेटवर्कने आतापर्यंत काही एअरलाईन्ससोबत करार केला आहे. त्यामध्ये कॅथे पॅसिफिक, जेटब्ल्यू, लुफ्थांजा, स्विस एअरलाईन्स, युनायटेड एअरलाईन्स, व्हर्जिन अटलांटिक यासारख्या एअरलाईन्सचा समावेश आहे.

– आयबीएमएनेही डिजिटल हेल्थ पास म्हणून एक एप्लिकेशन विकसित केले आहे. या एपच्या माध्यमातून कंपन्यांना कोरोना व्हायरसची चाचणी आणि तापमानाची चाचणी करणे यासारख्या गोष्टींची माहिती एपमध्ये समाविष्ट करता येते.

- Advertisement -

– WHO ने काही देशांना सल्ला दिला आहे की, वॅक्सिन पासपोर्टचा वापर हा केवळ एखाद्या ठिकाणी प्रवेशाच्या वेळी किंवा कामाच्या ठिकाणी तसेच दुसऱ्या देशात जाताना करता येऊ शकतो. कोरोनाच्या आजारावर उपचार घेतलेल्या व्यक्तींमध्ये दुसऱ्यांदा होणाऱ्या संसर्गासाठीच्या अॅण्टीबॉडिज तयार झालेल्या नाहीत असा सद्यस्थितीला कोणताही असा पुरावा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

– सद्यस्थितीला असा कोणताही पुरावा नाही, ज्यामध्ये एण्टीबॉडीमुळे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचा उल्लेख नाही, किंवा रिस्क फ्री असे सर्टीफिकेटही शाश्वत नाही. म्हणूनच अशा इम्युनिटी पासपोर्टच्या माध्यमातून भविष्यातही कोरोना फैलाव वाढण्याचा धोका कमी होणार नाही असे WHO ने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -