घरमनोरंजन'अंदाज अपना अपना'ला झाले २५ वर्ष पूर्ण; विजू खोटेंच्या रॉबर्टची आठवण

‘अंदाज अपना अपना’ला झाले २५ वर्ष पूर्ण; विजू खोटेंच्या रॉबर्टची आठवण

Subscribe

हा चित्रपट ४ नोव्हेंबर १९९४ साली सर्वत्र प्रदर्शित झाला होता. 

राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘अंदाज अपना अपना’ हा चित्रपट बॉलिवूडच्या काही उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. एका श्रीमंत मुलीच्या मागे दोन वेडे झालेले मजनू, त्यांच्यातील लढाई आणि भरपूर धम्माल विनोद यांमुळे प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाचे डायलॉग आजही तोंडावर आहेत. आज ४ नोव्हेंबर रोजी ‘अंदाज अपना अपना’ला २५ वर्ष पूर्ण झाले आहेत. यासह अमर-प्रेम यांची मैत्री आजही आपल्यात तेवढीच खास आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर १९९४ साली सर्वत्र प्रदर्शित झाला होता.

विजू खोटेंच्या रॉबर्टच्या भूमिकेस पसंती

‘अंदाज अपना अपना’ मध्ये सलमान खान, आमिर खान, करिश्मा कपूर आणि रवीना टंडन मुख्य भूमिका साकारली. असे असले तरी या चित्रपटातील एक मराठमोळा कलाकार विजू खोटे यांनी देखील रॉबर्टची उत्तम भूमिका साकारली होती. नुकतेच विजू खोटेंचे निधन झाले. या निधनानंतर देखील त्यांच्या चाहत्यांनी ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील त्यांची रॉबर्टची विनोदी भूमिका अधिक पसंत केली. या भूमिकेला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली असून या चित्रपटातील त्यांची रॉबर्टची भूमिका आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. 

- Advertisement -

‘गलती से मिस्टेक हो गया.’

विजू खोटे यांनी एकूण ३०० चित्रपटांत काम केले. यापैकी शोले चित्रपटांनी त्यांना ओळख दिली. या चित्रपटात डाकू ‘कालिया’ बनलेले विजू खोटेंचा ‘सरदार मैंने आपका नमक खाया है’ डायलॉग देखील गाजला. या चित्रपटानंतर विजू खोटे यांनी सलमान खान आणि आमिर खानचा चित्रपट ‘अंदाज अपना अपना’ मध्ये देखील भूमिका साकारली. यामध्ये विजू खोटे यांनी रॉबर्ट ही भूमिका साकरली असून ‘गलती से मिस्टेक हो गया.’ हा डायलॉग त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलाच गाजला. ‘अंदाज अपना अपना’ ला आज २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा विजू खोटेंच्या रॉबर्टची आठवण झाली आहे.

हे आहेच मजेदार संवाद

1. में तो कहता हू आप पुरुष ही नहीं है … महा पुरुष है मै पुरुष!

- Advertisement -

2: ये तेजा तेजा क्या है, ये तेजा तेजा.

3: रवीना जी मैं आपसे पेट की बात.. दिल की बात बोलना चाहता हुं.

4. ये तेले पर मिला था .. इसका नाम तेलु है ..

5. ऐसा लग रहा है जैसे बंदर के सर पे तरबूज.

6: आमलेट का राजा, और ब्रेड का बादशहा … बजाज … हमारा बजाज.

7: तेजा मैं हूं, मार्क इधर है.

8: गलती से मिस्टेक हो गया.

9: तुम्हारा प्लान हाय गलत था, बाप को किडनैप करके बेटी से पैसा मांगते हो. लागता है कच्चा खिलाडी है.

10: मैं तेजा हूं … नही मैं असली तेजा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -