घरताज्या घडामोडीManipur Violence : हे मानवतेला कलंक, महिलांच्या धक्कादायक घटनेवर आशुतोष राणाची पोस्ट...

Manipur Violence : हे मानवतेला कलंक, महिलांच्या धक्कादायक घटनेवर आशुतोष राणाची पोस्ट चर्चेत

Subscribe

मागील अडीच महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये शेकडो लोकांनी आपली जीव गमावला असून हजारो कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. सोशल मीडियावर मणिपूरमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी देखील त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या स्त्रीचं शोषण, तिच्यावरील अत्याचार, अपमान, हे अर्ध्या मानवतेवर नसून संपूर्ण मानवतेला कलंक आहे, अशा शब्दांत बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

इतिहास साक्षी आहे की, जेव्हा एखाद्या स्त्रीचे अपहरण किंवा लैंगिक वस्त्रहरण केलं जातं. तेव्हा संपूर्ण मानवजातीला किंमत चुकवावी लागते. ज्याप्रमाणे सत्य,तप,पवित्रता आणि दान हे धर्माचे चार स्तंभ आहेत. त्याचप्रमाणे विधिमंडळ, प्रशासन, न्यायपालिका आणि पत्रकारिता हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. लोकशाहीच्या या चारही स्तंभांना ऐकमेकांशी एकरुप होऊन वाटचाली कारावी लागेल, तरच ते अमानुष कृत्यांच्या नरसंहारातून जनतेची सुटका करू शकतील, असं आशुतोष राणा यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

सर्व राजकीय पक्ष, राजकारणी, मीडिया हाऊस आणि कर्मचाऱ्यांना आपापसातील मतभेद आणि ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं विसरून राष्ट्रहितासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील. कारण हे राष्ट्र सर्वांचं आहे. सर्व पक्ष आणि राजकीय पक्ष देश आणि देशवासियांचं संरक्षण, पालनपोषण आणि समृद्ध करण्यासाठी कटीबद्ध आहेत.

आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्त्रीचं शोषण, तिच्यावरील अत्याचार, तिचा अपमान.. हे अर्ध्या मानवतेवर नसून संपूर्ण मानवतेला कलंक आहे, अशा शब्दांत देखील राणा यांनी आवाहन केलं आहे.

- Advertisement -

मणिपूरमध्ये 3 मे 2023 रोजी जातीय हिंसाचाराला सुरुवात झाली होती. मणिपूर राज्यातील चुरचंदपूर जिल्ह्यात असलेल्या तोरबांग येथे ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियनने ‘आदिवासी एकता मोर्चा’ काढला होता. यानंतर या मोर्चाला हिंसक वळण आले आणि हिंसाचार उफाळला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 4 मे रोजी जमावाने या दोन पीडित महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढली. तसेच त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचाही आरोप होत आहे. त्याचदिवशी जमावाने 21 वर्षीय पीडित महिलेच्या 19 वर्षीय भावाची हत्या केली होती. एक कथित बनावट व्हिडीओ समोर आल्यानंतर संतप्त जमावाने हे घृणास्पद केल्याची माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.


हेही वाचा : आधी भावाची हत्या, मग विवस्त्र करून बहिणीची धिंड काढली; दोन महिन्यांपूर्वी मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -