घरमनोरंजन'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या सेटवर गोविंदा बिग बी यांना 7 तास थांबायला...

‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या सेटवर गोविंदा बिग बी यांना 7 तास थांबायला लावायचा…

Subscribe

सिनेविश्वातील दोन अभिनेते अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांनी दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ‘हम’ (1991) केल्यानंतर अमिताभ आणि गोविंदाने 1998 मध्ये ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा सुपरहिट चित्रपट केला. हा चित्रपट जितका हिट झाला तितकीच अमिताभ आणि गोविंदाची जोडीही खूप आवडली. पडद्यावरची अमिताभ-गोविंदाची कॉमेडी असो वा गाणी या सर्वांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली. लवकरच याच शीर्षकाचा आणखी एक चित्रपट येत आहे, ज्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ असणार आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गोविंदा खूप उशिरा यायचा तर अमिताभ बच्चन सेटवर वेळेवर यायचे. अभिनेता शहजाद खान याने गोविंदाच्या उशिरा येण्याचा किस्सा सांगितला आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते . हा चित्रपट शूट करण्यासाठी दिग्दर्शकाला खूप घाम गाळावा लागला.अनेकदा गोविंदा सेटवर 6-7  तास उशिरा पोहोचायचा, त्यामुळे दिग्दर्शकाला अमिताभ बच्चन यांना हुशारीने व्यस्त ठेवावे लागायचे.

- Advertisement -

या चित्रपटात काम केलेला अभिनेता शहजाद खान याने याचा खुलासा केला आहे . सिद्धार्थ कन्ननसोबतच्या संभाषणात  शेहजाद खानने सांगितले की, ‘गोविंदा जेव्हाही सेटवर उशिरा यायचा तेव्हा डेव्हिड त्याला हुशारीने हाताळायचा. गोविंदाला उशीर झाल्याचे लक्षात येऊ नये म्हणून ते अमिताभ बच्चन यांना व्यस्त ठेवायचे’. शहजाद खानने चित्रपटाबाबत आणखी एक किस्सा शेअर केला आहे, जो गोविंदाच्या निष्काळजीपणाबद्दल आहे. शहजादने सांगितले की, ‘गोविंदा एकदा खोटे बोलून मुंबईला गेला आणि एक दिवसानंतर परत आला’.

‘बडे मियाँ छोटे मियाँ ‘ हा 1998 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात अमिताभ आणि गोविंदासोबत रवीना टंडन, माधुरी दीक्षित, परेश रावल आणि अनुपम खेर या स्टार्सनी एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गोविंदा खूप उशिरा यायचा तर अमिताभ बच्चन सेटवर वेळेवर यायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -