घरमहाराष्ट्रपुणेMaharashtra Politics : नणंद-भावजयीमधला वाद स्टेजवरही, सुप्रिया सुळेंचे भाऊ-वहिनीकडे दुर्लक्ष

Maharashtra Politics : नणंद-भावजयीमधला वाद स्टेजवरही, सुप्रिया सुळेंचे भाऊ-वहिनीकडे दुर्लक्ष

Subscribe

बारामतीतील नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने पवार कुटुंब एकाच मंचावर आले. पण यामुळे पवार कुटुंबात पडलेली फूट स्पष्टपणे पाहायला मिळाली.

पुणे : बारामतीत आज (ता. 02 मार्च) नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वातावरण रंगलेले पाहायला मिळाले. पण आज या मेळाव्याच्या व्यासपीठावर जे काही घडले, त्यामुळे पवार कुटुंबातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु, त्याआधी या दोघीही एकाच व्यासपीठावर समोरासमोर आल्याने या दोघींमध्ये जे काही घडले, ते पाहून सर्व बारामतीकरांना धक्का बसला आहे. (Maharashtra Politics : Controversy between Supriya Sule, Ajit Pawar, Sunetra Pawar was seen on stage of Namo Rozgar Melava)

हेही वाचा… Supriya Sule : बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याआधी सुप्रिया सुळे म्हणाल्या- कुटुंबात वाद नाही

- Advertisement -

बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे व सरकारमधील इतर काही मंत्री एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्व मान्यवर स्टेजवर आले. यावेळी सर्वांनी एकमेकांना नमस्कार केला. विचारपूस केली. सुप्रिया सुळेही स्टेजवर आल्या. त्यांनी स्टेजवर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नमस्कार केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच अजित पवारही होते. पण त्यांना पाहताच सुळेंनी पुढे जाणे टाळले आणि त्या मुख्यमंत्र्यांच्या मागून पुढे गेल्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. सुळे या अजितदादांना भेटल्याही नाही किंवा त्यांची विचारपूसही केली नाही. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर खासदार सुळे या पुढे जाऊन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटल्या. यावेळी त्यांनी वळसे पाटलांच्या बाजूला उभ्या असलेल्या सुनेत्रा पवारांकडेही पूर्णतः दुर्लक्ष केले. याआधी या नणंद-भावजयीमधील नाते फार वेगळे होते. कौटुंबिक कार्यक्रमात त्या नेहमी सोबत दिसत होत्या. परंतु, आता मात्र सुप्रिया सुळेंनी त्यांना पाहून स्मितहास्य करणाऱ्या सुनेत्रा पवारांना समोर उभे पाहूनही दुर्लक्ष केले. पण बारामतीकर हे सर्व पाहून नक्कीच चक्रावले असणार.

- Advertisement -

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंब दोन-तीन कार्यक्रमासाठी एकत्र जमले. पण त्यांच्यातील तो दुरावा चार भिंतीच्या आत असल्याने फारसा कळून आला नाही. परंतु, पहिल्यांदाच शासकीय कार्यक्रमाच्यानिमित्ताने पवार कुटुंब एकाच मंचावर आल्याने त्यांच्यातील खरा दुरावा सर्वांच्या समोर आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणतेही राजकीय पद किंवा लोकप्रतिनिधी नसतानाही सुनेत्रा पवार यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले. एरव्ही कोणत्याही राजकीय कार्यक्रमात त्या नसतात. पहिल्यांदाच त्या जाहीर राजकीय कार्यक्रमात सामील झाल्या. त्यामुळे सुनेत्रा पवार या बारामतीतून लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -