घरमनोरंजनबाळाचे नाव काय ठेवू , विचारते 'भाभीजी'

बाळाचे नाव काय ठेवू , विचारते ‘भाभीजी’

Subscribe

'भाभीजी घर पर है' या छोट्या पडद्यावरील मालिकेतील अभिनेत्री सौम्या टंडन हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला असून त्या बाळाच नाव काय ठेवू? नाव ठेवण्यासाठी मला मदत करा अशी मागणी सौम्या टंडन हिने चाहत्यांकडे केली आहे.

घरात रांगणार बाळ येणार म्हटलं का घरात नावावरुन एकच चर्चा रंगते. मुलगा किंवा मुलगी झाली तर काय नाव ठेवायच यावर प्रत्येकजण आपले मत देत असतात. मात्र बऱ्याचदा नाव ठेवण्यावरुन संभ्रम देखील निर्माण होतो. असाच संभ्रम ‘भाभीजी घर पर है’ या छोट्या पडद्यावरील मालिकेतील अभिनेत्री सौम्या टंडन हिचा झाला आहे. सौम्या टंडन हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. नुकताचं सौम्यानं आपल्या गोंडस बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच आपल्या या गोंडस बाळाचं नाव काय ठेवावं यासाठी तिनं चाहत्यांकडून मदतही मागितली आहे.

सौम्याने केली इन्स्टाग्रामवर पोस्ट

‘आमच्या छोट्या मुलाचं नाव काय ठेवावं या संभ्रमात आम्ही आहोत. त्यामुळे मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही बाळासाठी नाव सुचवा. तसेच ते नाव वेगळं आणि लहान आणि गोड असले पाहिजे. त्याचप्रमाणे त्या नावाला एक छान अर्थ देखील असला पाहिजे. त्याचबरोबर जी व्यक्ती छान असं नाव सुचवणार आणि ते नाव जर बाळाला ठेवलं तर त्या व्यक्तीला छानशी भेटवस्तू देखील दिली जाणार आहे’ असं सौम्या टंडन आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

अभिनेत्री सौम्या टंडन हिला पुत्ररत्नाचा लाभ

‘भाभीजी घर पर है’ या छोट्या पडद्यावरील मालिकेतील अभिनेत्री सौम्या टंडन हिने १४ जानेवारीला तिच्या बाळाला जन्म दिला आहे. नुकतचं तिनं लहान बाळाचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केला असून तिने चाहत्यांना मला नाव सुचवण्यासाठी मदत करा असे देखील सांगितले आहे.

View this post on Instagram

Our bundle of joy!

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_) on

- Advertisement -

अभिनेत्री सौम्या टंडन हिने तिच्या गरोदरपणातील काही खास फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. या कारणामुळे सौम्याने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून ब्रेक देखील घेतला आहे.


वाचा – ‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -