घरट्रेंडिंग१११ वर्षांचे शिवकुमार स्वामी कालवश; ३ दिवसांचा दुखवटा

१११ वर्षांचे शिवकुमार स्वामी कालवश; ३ दिवसांचा दुखवटा

Subscribe

शिवकुमार स्वामी हे लिंगायत पंथातील ज्येष्ठ धर्मगुरू होते. राजकीय वर्तुळातही त्यांना मानणारी अनेक नेतेमंडळी आहेत.

कर्नाटकातील लिंगायत पंथाच्या सिद्धगंगा मठाचे सर्वेसर्वा शिवकुमार स्वामी यांना आज देवाज्ञा झाली. १११ वर्षे वय असलेल्या शिवकुमार स्वामी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. उपलब्ध माहितीनुसार, शिवकुमार स्वामी यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. वाढत्या वयासोबत त्यांचा हा त्रास बळावत गेला आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. शिवकुमार स्वामी यांचे खासगी डॉक्टर परमेश्वर यांनी याविषयी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. सध्या कर्नाटकात शिवकुमार स्वामी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून, हजारोंच्या संख्येने भाविक या अंतयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, कर्नाटक सरकारने आजपासून पुढील तीन दिवसांसाठी राज्यभरात दुखवटा जाहीर केला आहे. कर्नाटकसह महाराष्ट्रामध्येही शिवकुमार स्वामी यांचे लाखो अनुयायी आहेत.

शिवकुमार स्वामी हे लिंगायत पंथातील ज्येष्ठ धर्मगुरू होते. राजकीय वर्तुळातही त्यांना मानणारी अनेक नेतेमंडळी आहेत. आज मृत्यूपश्चात त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सामान्य भाविकांसोबतच अनेक राजकीय नेत्यांनीसुद्धा मठामध्ये हजेरी लावली होती. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीदेखील मठामध्ये येऊन, त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तर दुसरीकडे,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून शिवकुमार स्वामी यांना आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, शिवकुमार स्वामी यांच्या मृत्यूनंतर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्यामुळे पुढील ३ दिवस राज्यातील शाळा, कॉलेज आणि कार्यालये बंद राहणार आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -