घरमनोरंजनभरत जाधव घेऊन येतायत 'स्टेपनी'

भरत जाधव घेऊन येतायत ‘स्टेपनी’

Subscribe

एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन भरत जाधव पुन्हा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'स्टेपनी' असं या चित्रपटाचे नाव आहे.

अभिनेता भरत जाधव म्हटलं की अनेक नाटकांमधल्या त्यांच्या भुमिका डोळ्यांसमोर उभ्या राहतात. मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात भरत जाधव यांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. गेले अनेक वर्ष मालिका,नाटक आणि चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच मनोरंजन केलं आहे. पण गेले काही वर्ष नाटकांच्या प्रयोगामुळे ते चित्रपटसृष्टीपासून दूर राहीले होते. लवकरच भरत जाधव यांचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन भरत जाधव पुन्हा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. ‘स्टेपनी’ असं या चित्रपटाचे नाव आहे. या अतरंगी नावावरूनच चित्रपटात नक्कीच वेगळे काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की आहे. आता कोणती ‘स्टेपनी’, कोणाची ‘स्टेपनी,  अशा सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

- Advertisement -

नुकतच भरत जाधव यांचे मोरूची मावशी हे नाटकं नुकतं रंगभूमीवर दाखल झालं आहे.

- Advertisement -

भरत जाधव यांनी यापूर्वीही अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून  विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना पोट धरून हसवले आहे. आता ‘स्टेपनी’ या चित्रपटातून भरत जाधव पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये हशा पिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी भरत जाधव चित्रपटातून दिसणार असल्यामुळे धमाल मस्ती तर होणारच.

या चित्रपटची निर्मिती श्री गणराया फिल्म्स आणि अनंत भुवड, नरेंद्र जयस्वाल, भटूलाल जयस्वाल यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन अजीज नासीर यांनी केले असून छायांकन मुरली कृष्णा यांनी केले आहे. यासोबतच रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून राजेश एस. एस. यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. संतोष नाकट यांनी संवादाची तर देवदास भंडारे यांनी कला आणि उदय इनामती यांनी ध्वनीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाचे संकलन शशांक शाह यांनी केले असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -