घरदेश-विदेशइस्त्राईलचे यान चंद्रावर उतरण्यास अयशस्वी

इस्त्राईलचे यान चंद्रावर उतरण्यास अयशस्वी

Subscribe

इस्त्राईलचे बेरेशीट हे यान चंद्रवरील चुंबकीय क्षेत्र मोजणार होते. मात्र, चंद्राच्या कक्षेत पोहचूनसुद्धा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास ते अयशस्वी ठरले आहेत.

इस्त्राईलने आपले एक यान चंद्रावर पाठवले होते. ‘बेरेशीट’ असे या यानाचे नाव आहे. अंतराळ यान चंद्रावर पोहचले मात्र शेवटच्या क्षणी पुष्ठभागावर उतरवण्यास अयशस्वी ठरले आहे. इस्त्राईलचे याग चंद्राच्या कक्षेत यशस्वी रित्या गेला. पण तिथे उकरू शकले नाही. पहिल्यांदाच इस्त्राईलने आपल्या खासगी आर्थिक बळावर ही मोहीम राबवण्यात आली होतो. मात्र, ‘बेरेशीट’ हि मोहिम यशस्वी झाली असती तर इस्त्राईल हा सोव्हियत युनियन, चीन आणि अमेरिकानंतर यशस्वी रित्या चंद्रवर उतरण्यारा चौथा देश ठरला असता.

पोहचला असता तर चौथा स्थानावर

‘बेरेशीट’ या यानाची निर्मिती इस्त्राईल एरोस्पेस इंडस्ट्रिजने आणि स्पेसिलने (spacell) केली आहे. तसेच चंद्राच्या जवळ पोहचलो पण यान उतरवण्यास अयशस्वी ठरलो. पुन्हा तपास करून नेमके काय तांत्रिक समस्या उदभवली होती, हे जाणून घेणार आहोत. जर ‘बेरेशीट’ हे यान चंद्रावर यशस्वी रित्या चंद्रावर उतरले असते, तर इस्त्राईल चौथा क्रमांकवर पोहचला असता, असे यानाच्या कंट्रोल रूममधून सांगितले. अंतिम क्षणी तंत्रीत बिघाडामुळे या यानाशी संपर्क तुटला त्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे शक्य झाले नाही.

- Advertisement -

४ एप्रिलला चंद्राच्या कक्षेत

इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे कंट्रोल रूमवरून लक्ष ठेऊन होते. बेरेशीट या यानाने ४ एप्रिल रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. हे यान चंद्रावरील चुंबकीय क्षेत्र मोजणार होते. मात्र, ते चंद्राच्या कक्षेत पोहचले, पण चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचू शकली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -