घरमनोरंजनBigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात ईशान सहगलने मायशा अय्यरला केलं...

Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात ईशान सहगलने मायशा अय्यरला केलं प्रपोज, फराह खानने उडवली खिल्ली

Subscribe

सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीप्रमाणे हिंदीची चर्चा गाजयेय. (Bigg Boss hindi 15) बिग बॉस मराठीच्या घऱाच दररोज नवीन समीकरण पाहण्यास मिळते. कधी  भांडण तरी कधी प्रेम याचा मिलापच म्हणजे बिग बॉस हिदींचे घर आहे.  यातच ‘बिग बॉस १५’ शोचा लेटेस्ट ‘विकेंड का वार हा एपिसोड’ अनेक अविस्मरणीय क्षणांनी भरलेला होता. या एपिसोडमध्ये म्युझिक, ड्रामा, मस्तीपासून सर्व गोष्टी पाहाय़ला मिळाल्या. दरम्यान एक कपलचा लव्ह ट्रॅगल या एपिसोडमधील चर्चेचा विषय ठरला. यावेळी शमिता शेट्टी आणि विशाल कोटियन यांना ‘रेडिओ शो द अक्का अन्ना’ शो आयोजन करण्याची जबाबदारी दिली होती. यावेळी शमिता आणि विशालने घरातील स्पर्धकांशी बातचीत करत खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. या मज्जा मस्तीदरम्यान ईशान आणि मायशाला एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त करण्यास सांगण्यात आले.

यावेळी ईशानने सर्वांसमोर येत सांगितले की, या शोचा प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी अधिकच महत्वाचा आहे. या शोमध्ये येऊन त्याला आपले प्रेम गवसेल असे कधी वाटलं नव्हतं. यावर पुढे त्याने सांगितले की, घरातील सर्व सदस्यांना फक्त हा शो मिळालाय, मात्र त्याला एक मौल्यवान वस्तू मिळालीय ती म्हणजे बिग बॉसच्या घरातील स्पर्धक मायशा अय्यर. विशेष म्हणजे ईशान सहगलने गुडघ्यावर बसून मायशा अय्यरला प्रपोज करत प्रेमाची कबूली दिली आहे.

- Advertisement -

ईशाने मायशाच्या डोळ्यात पाहत सांगितले की, तुझ्यासोबत असताना मला ज्या फिलिंग जाणवतात त्या मला इतर कोणासोबत जाणवत नाहीत. यावर ईशान आपल्या प्रेमाची कबूली देत म्हणतो..मी ईशान… मायशा मला तु हवी आहेस? पण तुला मिशान (माय़शा)?. यावेळी मायशानेही ईशाला मिठी मारत ‘आय लव्ह यू’ म्हणत प्रेम व्यक्त केलं. एकूणचं ईशान आणि मायशामुळे घरात अगदी रोमँटिक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे सर्व स्पर्धकांनी टाळ्या वाजत ‘इक्श वाला लव्ह’ गाण्यावर डान्स केला.

यावेळी फराह खानला बिग बॉसच्या घरात एक स्पेशल गेस्ट म्हणून बोलवण्यात आले होते. यावेळी सलमान खानने फराहला मायशाला ईशानने प्रपोज केल्याचे सांगितले. यावर फराह खिल्ली उडवत म्हणाली, एवढ्या लवकरं कसं कोण प्रेमात पडू शकत. पहिल्या नजरेत प्रेम होत ऐकूण होते मात्र तुम्हाला एका रात्रीत प्रेम झालं.

- Advertisement -

मात्र मायशा ईशानच्या प्रपोजलने अधिकचं खुश झाली होती. यावेळी निशांत भटने मायशाला तिला असं करुन नकोस असं सांगत… शोमध्ये स्वत:ची थट्टा करुन घेऊ नकोस असा सल्ला दिला. मात्र मायशाने निशांतला तू अशा गोष्टी बोलू नको असं सांगत ईशान तिच्यावर खूप प्रेम करतो. हे प्रेम फक्त शोपुरतं नसून खरं असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या.


Mumbai Crime: मुंबईत ‘टकटक गँग’ची दहशत, ५० हजारांच्या मोबाईलसह ३ आरोपींना अटक


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -