घरक्रीडाT20 World Cup: धोनीने मेंटॉर म्हणून अ‍ॅक्शन मोडमध्ये ! BCCI म्हणाली...

T20 World Cup: धोनीने मेंटॉर म्हणून अ‍ॅक्शन मोडमध्ये ! BCCI म्हणाली…

Subscribe

आगामी टी २० विश्वचषकासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी भारतीय संघासोबत रविवारपासून जोडला गेला आहे. टी २० विश्व चषकासाठी धोनीकडे मेंटॉर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयच्या विनंतीला मान देत धोनीने भारतीय संघाला टी २० विश्व चषकासाठी मदत करणार असल्याचे कबुल केले आहे. बीसीसीआयनेही धोनीला ग्रॅंड वेलकम करत Welcome to the KING म्हटले आहे. भारतीय टी २० संघाने रविवारी सराव केला. या सामन्यात धोनी टीमसोबत सराव करताना पहायला मिळाला. धोनी आपल्या मेंटॉरच्या भूमिकेत लगेचच आला आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोंमध्ये धोनी दिस आहे. भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री, गोलंदाजी कोच भरत अरूण आणि फिल्डिंग कोच आर श्रीधरसोबत महेंद्रसिंह धोनीही दिसत आहे. धोनीचे स्वागत करताना बीसीसीआयने म्हटले आहे की, किंग महेंद्र सिंह धोनीचे भारतीय संघात पुन्हा एकदा जोरदार स्वागत. धोनी भारतीय संघाच्या मेंटॉर भूमिकेत एक्टीव्ह झाल्यासाठी कर्णधार विराट कोहलीनेही आनंद व्यक्त केला आहे. धोनीच्या उपस्थितीत संघाचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढेल असेही कोहलीने म्हटले आहे.

- Advertisement -

धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या आयपीएल हंगामात चौथ्यांदा विजेतेपदाचा मान मिळवला आहे. तर आयपीएल दरम्यानच भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडचे नाव समोर आले आहे. त्यामुळेच भारतीय संघातील नवोदित खेळाडूसाठी धोनी, द्रविडसारख्या दिग्गज खेळाडूंचा सहवास लाभणार आहे. त्यांच्या हजेरीने संघातील खेळाडूंना आत्मविश्वास मिळतानाच त्यांच्या अनुभवाचाही संघाला फायदा होईल, असा बीसीसीआयचा मानस आहे. त्यामुळेच मेंटॉरच्या भूमिकेत असलेला धोनी आणि मुख्य प्रशिक्षक पदावर असलेला राहुल द्रविड अशी जोडी आगामी काळात भारतीय संघासाठी योगदान देताना पहायला मिळणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघाचे नेतृत्व करताना धोनीने टी २० विश्वचषक जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वार भारतीय संघाने वेगवेगळ्या फॉरमॅटचे जेतेपद मिळवले आहे. तर राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाच्या अंडर १९ टीमला प्रशिक्षण मिळाले आहे. द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असलेला मोठा अनुभव पाहता, द्रविडच्या नेतृत्वाचा फायदा भारतीय संघाला होणार आहे. त्यामुळेच आगामी कालावधीत भारतीय संघातील युवा खेळाडूंना या अनुभव क्रिकेटपटूंचा नक्कीच फायदा मिळेल याची खबरदारी बीसीसीआयने घेतली आहे. भारतीय संघाचा टी २० वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना हा पाकिस्तानसोबत होणार आहे. या सामन्याकडे भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – चहलवर जातीयवादी टिप्पणी केल्याप्रकरणी युवराज सिंगला अटक अन् जामीन

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -