घरमनोरंजन'घरातली सदस्यांनी कायम मला एकटं पाडलं'

‘घरातली सदस्यांनी कायम मला एकटं पाडलं’

Subscribe

बिग बॉस मराठीच्या घरातून हिना पांचाळ बाहेर पडली आहे. हिनाच्या बाहेर पडल्यामुळे तीचा सुंदर डान्स प्रेक्षकांना बघायला मिळणार नाहीये. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर हिनाचे काय प्लॅन आहेत? बिग बॉसच्या घरात तीचा कोणीच मित्र का नाही होऊ शकलं या विषयी जाणून घेऊयात हिना कडूनच..

1. बिग बॉसच्या घरातील तुझा अनुभव कसा होता?
– मी जेवढे दिवस होते तेवढे दिवस मी खूप मज्जा केली. खूप काही शिकले. अनेक नव्या गोष्टींची ओळख मला या घरात झाली. सगळ्यात महत्ताच होतं घरात टास्क खेळणं आणि मी माझे सगळे टास्क खूप चांगल्या पध्दतीने पुर्ण केले. मी एक डान्सर असल्यामुळे माझ्यात खूप स्टॅमिना आहे. त्याचा पुर्ण वापर मी टास्क पुर्ण करताना करायचे. मी कधीच थकते नव्हते. मी या घरात आले तेव्हा मला मुंबईत स्वत:च घर घ्यायचं होतं. पण हे स्वप्न पुर्ण झालं नाही. मी जरी घरातून बाहेर आले असले तरी मी लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

2. तुला घरात एकटं पाडलं असा कायम तुझा आरोप होता?
ही खरी गोष्ट आहे. सतत मला घरात विरोध केला होता. प्रत्येक गोष्टीत मी काही केलं की त्याला लगेच विरोध व्हायचा. सगळ्यात आधी माझ्या जेवणावरून मला विरोध झाला. एका भाकरीवरून मला खूप त्रास दिला. सगळ्यांनी ठरवून वाद निर्माण केला. एखाद्या माणसाला जेवण दिलं नाही हे किती वाईट आहे. ते असे का वागले ते आजही मला कळत नाहीये. त्याचप्रमाणे माधव आणि नेहाला मी माझ्या खूप जवळच्या मित्रांची नावं दिली होती. पण त्यांनी देखील मला कायम एकट पाडलं. माझ्या विरोधात ते नेहमी बोलायचे.

- Advertisement -

३. बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठी चूक कोणती?
– घरात सगळे माझ्या विरोधात गेले होते. त्याचवळी एका टास्क दरम्यान मी संचालिका होते आणि मी माझे निर्णय वेळोवेळी बदलले ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. मी घरातल्यांचे निर्णय ऐकत राहीले मला वाटलं या निमित्ताने तरी ते माझ्याशी चांगले वागतील. पण तसं झालं नाही यामुळे माझच नुकसान झालं. त्याचप्रमाणे खुर्ची सम्राट टास्कमध्ये मी शिवच्या मांडीवर जाऊन बसले. खरतर ही एक स्ट्रॅटजी होती पण ते खूप चुकीच्या प्रकारे बाहेर गेलं. विकेंडच्या डावात ही माझी चूक महेश सरांनी लक्षात आणून दिली.

४. बिचुकले यांच्याबरोबर तुझी मैत्री झाली पण काही सदस्यांबरोबर का झाली नाही?
– मला कायम असं वाटतं की माझ्याप्रामणेच बिचुकल्यांनाही घरातील सदस्य एकटे पाडतात. मला त्यांची सगळीच गोष्ट पटते असे नाही. ते शिव्या देताता हे मला अजिबात आवडत नाही पण ते माणूस म्हणून चांगले आहेत. ते जे काही वागतात ते फक्त कटेंट देण्यासाठी, प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी करतात. पण अनेकवेळा निव्वळ टाईमपास म्हणून त्यांच्याबरोबर बसायचे. घरातील इतर सदस्यांनी माझ्याबरोबर मैत्री केली नाही. पण अभिजीत बिचुकले एकमेव होते की त्यांना माझं बोलणं पटायचं.

- Advertisement -

५. तू घरातून बाहेर पडल्यामुळे प्रेक्षकांना तुझ्या डान्सची आठवण येईल.
– गाणं आणि डान्स हा माझा आत्मा आहे. बिग बॉसच्या घरात छान गाण्याने दिवसाची सुरूवात व्हायची. आणि मनमूराद डान्सचा आनंद लुटायचे. घरात शिव हा पण खूप उत्तम डान्सर आहे. अनेकवेळा आम्ही एकत्र डान्स करायचो. घरात आलेल्या पाहूण्यांना देखील माझा डान्स आवडायचा. महेश सर प्रत्येक विकेंडच्या डावाला जान्ल करायला सांगायचे. शिवानी मला अनेक वेळा म्हणायची मला डान्स शिकव. मी तीला डान्स शिकवण्याचा प्रयत्नही केला पण ती कधीच डान्स शिकली नाही. पण मी मात्र मला संधी मिळेल तेव्हा डान्स केला. प्रेक्षकांना मी एवढच सांगेन लवकरच मी तुमच्यासमोर एक छान डान्स घेऊन येईन. मला आता डान्स रिअ्रलिटी शोमध्ये जाण्याची इच्छा आहे.

६. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तुझे काय प्लॅन आहेत?
आता घरातून बाहेर आल्यानंतर आता हिंदी रिअॅलिटी शो करणार आहे. मला हिंदी बिग बॉसच्या घरात जायची इच्छा आहे. त्याचप्रमाणे मी आतापर्यंत अनेक आयटम साँग केले आहेत पण आता मी खूप विचारकरून गाणी निवडणार आहे. नवनवीन डान्स प्रकार मला आता शिकायचे आहेत.

'अभिजीत बिचुकले फक्त कॅमेरासाठी असे वागतात'

बिग बॉस मराठीच्या घरातून हिना पांचाळ बाहेर आली. घरातून बाहेर आल्यानंतर तीने घरातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 20, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -