घरमनोरंजनतो परत येतोय

तो परत येतोय

Subscribe

लवकरच बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिझनमध्ये कोण कोण कलाकार असणार याबाबत उत्सुकता आहे.

मनोरंजनाचा तिसरा डोळा आता पुन्हा एकदा उघडणार आहे. गेल्या वर्षीपासून मराठी बिग बॉसला सुरूवात झाली. पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. वाद,प्रेम, भांडणं,तंटे अशा गोष्टींनी खच्चाखच भरलेला हा पहिला सिझन होता. हिंदी बिग बॉसप्रमाणे मराठी बिग बॉसचा स्वतंत्र चाहतावर्ग तयार झाला. मराठी बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन येणार आहे. या सिझनचा पहिला प्रमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

तो परत येतोय… #BiggBossMarathi #BBMarathi #ColorsMarathi

Posted by Colors Marathi on Sunday, March 17, 2019

- Advertisement -

मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिझनचे दिग्दर्शक, अभनिते महेश मांजरेकर यांनी होस्टींग केले होते. महेश सरांच्या होस्टींगचे सगळ्यांनीच खूप कौतूक केले. बिग बॉसचे स्पर्धक, त्यांच्यावर होणारे अरोप यांचा योग्य समतोल साधत महेश मांजरेकरांनी केलेल्या होस्टगचे सगळेच फॅन झाले. या आधी हिंदी बिग बॉसचं होस्टीग दबंग खान सलमान खान करत होता. त्यामुळे मराठी बिग बॉसचं होस्टींग कोण करणार याची उत्सुकता सगळ्यांमध्येच होती.

मराठी बिग बॉसच्या अंतीम फेरीत मेघा धाडे,पुष्कर जोग,सई लोकूर,अस्ताद काळे,स्मिता गोंदकर आणि शर्मिष्ठा राऊत यांनी धडक मारली होती. मेघाचं भांडण असो किंवा सई-पुष्करचं हेल्दी फ्लर्टिंग असो प्रेक्षकांना या सिझनने भरपून मनोरंजन केलं. या पर्वात पहिल्या सिझनची विजेती मेघा धाडेवर अनेक अरोप झाले. तिच्या जवळचे ही नंतर तिच्या विरोधात गेलेल बघायल मिळाले. यावेळी घरात अनेक भांडणही झाली. अखेर मेघाने या सिझनमध्ये बाजी मारली. तर सगळ्यांचा लाडका पुष्कर जोग पहिला सिझनचा उपविजेता ठरला.

- Advertisement -

आता नवीन येणाऱ्या सीझनमध्ये कोण कोण मराठी कलाकार असणार? पुन्हा एकदा महेश मांजरेकर या कार्यक्रमाची धूरा सांभाळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना कळतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -