घरमुंबईकबुतरांमुळे वाढत आहेत माणसांचे आजार!

कबुतरांमुळे वाढत आहेत माणसांचे आजार!

Subscribe

धूळ, प्रदूषण, कबूतर आणि किड्यांच्या विष्ठेपासून वेगवेगळ्या प्रकारच्या दीडशेहून अधिक प्रकारच्या अलर्जी मानवी शरीरात होतात.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, कबुतरांच्या संसर्गामुळे मुंबई आणि परिसरात न्यूमोनिया आणि फुफ्फुंसाचे आजार बळावत आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील सिडको वसाहतीत काही दिवसांपासून कबुतरांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगडचे नागरिक कबुतरांच्या त्रासाला कंटाळले आहेत. पक्षी पर्यावरणासाठी पूरक मानले जात असले तरीही कबुतरांची संख्या वाढणे मानवी आरोग्यास धोकादायक ठरते आहे. पिंपरी-चिंचवड येथे कबुतरांवर अभ्यास करणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाने हा निष्कर्ष दिला आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कबुतरांची वाढती संख्या नागरिकांच्या आरोग्याला धोक्‍याची आहे. त्यामुळे, आता पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख पनवेलकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी जनजागृती करताना दिसत आहेत.

कबुतरांची विष्ठा अपायकराक

नेरुळच्या तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. अभय उप्पे यांनी, कबुतरांच्या विष्ठेचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो याविषयी अधिक माहिती दिली आहे. उप्पे म्हणातात, “कबुतरांच्या पंखातून निघणाऱ्या फिदर डस्टमुळे अती संवेदनशील न्यूमोनिया आणि फुफ्फुसाचे आजार बळावण्याची शक्‍यता असते. धूळ, प्रदूषण, कबूतर आणि किड्यांच्या विष्ठेपासून वेगवेगळ्या प्रकारच्या दीडशेहून अधिक प्रकारच्या अलर्जी मानवी शरीरात होतात आणि याला प्रतिबंध घातला नाही तर दमा बळावण्याची शक्‍यता वाढते. अनेकवेळा रुग्णांना सर्दी खोकल्याचा त्रास होत असतो, याचे कारण कबुतरांची विष्ठा असू शकते. कबुतरांच्या विष्ठेचा वास, त्यातून होणारे आजार तसेच पावसात कुजल्याने त्यात किडे होतात. लहान मुले गर्भवती महिला तसेच जेष्ठ नागरिक यांची प्रतिकार शक्ती कमी असते अशामध्ये कबुतरांची विष्टा संपर्कात आल्यास ऍलर्जीचे प्रमाण वाढते.”

- Advertisement -

विष्ठेकडे दुर्लक्ष करु नका

स्वित्झर्लंडमधील बसेल युनिव्हसिर्टीने ‘कबुतरांच्या विष्ठेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम’ याबाबत अभ्यास केला आहे. त्यानुसार कबुतरांच्या विष्ठेत नऊ प्रकारचे जिवाणू, पाच प्रकारचे विषाणू आणि परजिवी आढळून येतात. यातील १० पेक्षा कमी घटक माणसांमध्ये संसर्ग पसरवू शकतात. निरोगी सदृढ माणसाला कबुतरांमुळे फारसा धोका नाही. मात्र, प्रतिकारशक्ती कमी असलेले गंभीर आजार झालेल्यांना संसर्ग होऊन श्वसनाशी निगडीत आजार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कबुतरांच्या विष्ठेकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन डॉ अभय उप्पे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -