घरमनोरंजनमधुबाला यांचा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर!

मधुबाला यांचा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर!

Subscribe

संजय दत्तनंतर आता दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांचाही जीवनपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांच्या बहिणीने यासंबंधीची घोषणा केली असून वर्षाअखेरीस चित्रपटाची संपूर्ण माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल असे त्यांनी म्हटले आहे.

अप्रतिम सौंदर्य आणि दिलखेच अदांनी साऱ्या सिनेजगताला मोहित करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री मधुबालाचा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मधुबाला यांची धाकटी बहिण मधूर भूषण हे या बायोपिकची निर्मिती करणार असून नुकतीच त्यांनी यासंबंधीची अधिकृत घोषणा केली आहे. अद्याप या चित्रपटात कोणकोणते कलाकार असतील हे स्पष्ट झाले नसून या वर्षातील अखेरपर्यंत सर्व गोष्टी समोर येतील, असं मधूर भूषण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ‘संजू’ नंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला यांच्या बायोपिकची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असणार आहे.

अनेक वर्षांपासूनची इच्छा

गेल्या वर्षी दिल्लीतील मॅडम तुसाद संग्रहालयात मधुबाला यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची बहिण मधूर याही उपस्थित होत्या. तेव्हापासूनच मधुबाला यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर यावा, अशी इच्छा मनात येऊ लागल्याचे मधूर यांनी सांगितले. मधुबाला यांच्या बायोपिकची निर्मिती आपले जवळचे मित्र ब्रीज भूषण करणार असल्याचेही मधूर यांनी स्पष्ट केले. तसेच मधुबाला यांच्या आयुष्यावरील चित्रपट निर्मिती, त्यांच्यासंबंधीची कोणतीही कलाकृती आपली परवानगी घेतल्याशिवाय कोणीही करू नये, असेही मधूर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

खासगी आयुष्याचा उलगडा होणार

आपल्याला बॉलीवूड क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्र परिवाराकडून वारंवार बायोपिकबाबत विचारणा होत होती. मात्र बायोपिक बनवण्यासाठी योग्य वेळेची आपण वाट पाहत असल्याचे मधूर यांनी सांगितले. शिवाय चित्रपटातील कलाकार कोण असतील याबाबत तर्कवितर्क न लावण्याचा सल्ल्ही त्यांनी सर्वांना दिला आहे. मधुबाला यांनी ‘मुघल- ए- आझम’, ‘चलती का नाम गाडी’, ‘मि. अँड मिसेस ५५’, ‘महल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अभिनय केला असून यांचे वैयक्तित आयुष्यही तितकेच रंजक राहीले आहे. आता बायोपिकच्या माध्यमातून त्यांच्या खासगी जीवनाचा उलगडा होणार का हे पाहणे औस्त्युक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -