घरमहाराष्ट्रराज्यातील ११ जिल्हा रुग्णालयात मोफत किमोथेरपी

राज्यातील ११ जिल्हा रुग्णालयात मोफत किमोथेरपी

Subscribe

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने राज्यातील ११ जिल्हा रुग्णालयांत मोफत किमोथेरपी उपलब्ध करून देणार अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गडचिरोली, अमरावती, पुणे, जळगाव, रत्नागिरी, नाशिक, भंडारा, सातारा, वर्धा, अकोला, नागपूर या ११ जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने किमोथेरपी युनिट सूरू करण्याचं ठरवण्यात आलं असून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने असे युनिट सुरु करण्याचे प्रस्तावित करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात कर्करोगावर उपचार घेणं सोयीस्कर ठरणार आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

कर्करोगावरील उपचारांमध्ये महत्वाची असणारी किमोथेरपी राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे का ? असल्यास त्याबाबतची कोणती कार्यवाही करण्यात आली असा तारांकित प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -