घरमुंबईमुसळधार पावसामुळे विमानतळ परिसरात भिंत कोसळली

मुसळधार पावसामुळे विमानतळ परिसरात भिंत कोसळली

Subscribe

सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र तीन मालवाहक गाड्यांचे नुकसान झाले आहे.

सततधार सुरु असलेल्या पावसामुळे अंधेरी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील भिंत कोसळण्याची घटना आज सांयकाळी साडे पाचच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहाणी झालेली नाही. मात्र ३० ते ४० फुट रुंद ही भिंत असल्याने तेथेच उभ्या असलेल्या मालवाहू गाड्यांचे नुकसान झालेले आहे. ही भिंत खूप जुनी असल्यामुळे कोसळली असल्याचे स्थानीक नागरिकांनी सांगितले आहे. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी बोलावले असून आता भिंत उचलण्याचे काम सुरु आहे.

मुंबईत कालपासून पावसाचा जोर सुरुच आहे. सध्या जोर थांबला असता तरीही येत्या काही तासात मुसळधार पाऊस होणार असा अंदाड हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्यावर हळू हळू ते पाणी आता निथरायला लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -