घरताज्या घडामोडीBipin Rawat Chopper Crash: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राकडून शोक व्यक्त, शेरशाह चित्रपटादरम्यानचा फोटो...

Bipin Rawat Chopper Crash: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राकडून शोक व्यक्त, शेरशाह चित्रपटादरम्यानचा फोटो केला शेअर

Subscribe

देशाचे पहिले संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या निधनामुळे देश शोकग्रस्त आहे. देशाने चांगला अधिकारी गमावल्यामुळे देशाचे पंतप्रधान, मंत्री आणि नागरिकांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे. तसेच कलाकरांनीही संवेदना व्यक्त केल्या आहेत. बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने देखील सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान सिद्धार्थने कारगिल युद्धावर आधारित केलेल्या शेरशाह चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो आता व्हायरल होत आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिद्धार्थने ट्विट करत रावत यांच्यासोबत असलेला एक ग्रुप फोटो शेअर केला आहे. सिद्धार्थने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूची माहिती ऐकून दुःख झाले. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि ११ जणांचा मृत्यू झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान बिपीन रावत यांची भेट झाली असून ती माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ओम शांती असे सिद्धार्थ मल्होत्राने म्हटलं आहे.

- Advertisement -

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये सीडीएस बिपीन रावत आणि सिद्धार्थसह अनेक मान्यवर दिसत आहेत. दिवंगत लष्करी अधिकारी विक्रम बत्रा यांच्या कुटुंबीयांतील सदस्यसुद्धा या फोटोमध्ये आहे. कारगिल दिवसाच्या पूर्वसंध्येला शेरशाह या देशभक्तीवर असलेल्या सिनेमाचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सिडीएस बिपीन रावत हजर राहिले होते.

- Advertisement -

देशाचे पहिले संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचा गुरुवारी हेलीकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. बिपीन रावत वेलिंग्टनमध्ये एका सैनिकी शाळेतील कार्यक्रमासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. या कार्यक्रमाला हेलीकॉप्टरने जात असताना अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीसह ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. उच्च स्तरीय समिती गठीत केली असून या समितीने चौकशी सुरु केली आहे. रावत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल आहे.


हेही वाचा: कुन्नूरमधील हेलीकॉप्टर दुर्घटनेबाबत राजनाथ सिंहांची संसदेत माहिती, म्हणाले १२.८ वाजता हेलीकॉप्टर…


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -