घरताज्या घडामोडीBirthday Special: टॅक्सी ड्रायव्हर ते हॉलिवूडपर्यंतचा रणदीप हुड्डाचा प्रवास

Birthday Special: टॅक्सी ड्रायव्हर ते हॉलिवूडपर्यंतचा रणदीप हुड्डाचा प्रवास

Subscribe

अभिनेता रणदीप हुड्डा अशा कलाकारांपैकी एक आहे जे डोळ्यांनी बोलतात आणि जे न बोलता बरेच काम करतात. रणदीपला बॉलिवूडमध्ये नॅचरल Actor म्हणून ओळखले जाते. रणदीप हुड्डाने कमी चित्रपटात काम केले आहे. पण त्याने जितके चित्रपट केले आहेत, त्यामध्ये रणदीपने जबरदस्त काम केले आहे. रणदीपने अल्पावधीत बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे रणदीपने शिक्षण घेतले आहे. त्याचे एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. इतकेच नाहीतर रणदीप स्विमिंग आणि घोडोस्वारीमध्ये खूप माहिर असल्याचे मानले जाते. यामुळेच रणदीपला अनेक पुरस्कार मिळाले असल्याचे, म्हटले जाते. आज रणदीपच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने केलेला ट्रॅक्सी ड्रायव्हर ते हॉलिवूडपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

रणदीप स्वतः कुटुंबाची खूप काळजी घेतो. यामुळे त्याने ऑस्ट्रेलियामध्ये पॉकेटमनीसाठी त्याने ट्रॅक्सी चालवली, रेस्ट्रारंटमध्ये काम केले आणि कधी कधी गाड्या देखील धुतल्या. पण हे सगळे करणे व्यर्थ गेले नाही. रणदीपने थिएटरपासून मॉडेलिंगपर्यंत सर्व काही केले. रणदीपने ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटातून बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर चार वर्षांनंतर ‘डी’ चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली. रणदीपच्या दमदार अभिनयामुळे त्याचे अनेक चाहते आहेत. त्याने प्रत्येक भूमिकेसाठी स्वतःला वेगळ्या स्टाईलमध्ये तयार केले.

- Advertisement -

रणदीपचे त्याच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक एक्सपेरिमेंट केले आहेत. बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये रणदीप ‘एक्सट्रैक्शन’ चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले. त्या चित्रपटातील त्याच्या Action अवतारने सर्वांना इम्प्रेस केले. रणदीप त्याच्या आवडीनुसार चित्रपटात काम करतो. त्याने ‘हायवे’, ‘सरबजीत’, ‘किक’, ‘रंग रसिया’ अशा अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.


हेही वाचा – बिहारचे पोलीस महासंचालक म्हणाले, ‘रिया चक्रवर्तीची लायकी नाही’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -