घरताज्या घडामोडी'कोरोनाच्या नावाखाली राज्यात झोल, मनसेकडून सरकारची पोलखोल'

‘कोरोनाच्या नावाखाली राज्यात झोल, मनसेकडून सरकारची पोलखोल’

Subscribe

राज्यात कोरोनाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेने पत्रकार परिषद घेत कोरोना कोरोना सेंटरच्या कंत्राटामधला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या कार्यालयाचा दुरुपयोग करुन स्वत: च्या मुलाला कोरोना संदर्भातली कंत्राटे दिली आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. राजकारण करु नका, भ्रष्टाचार करा असे जर शिवसेनेला म्हणायचे असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोध करणार, असं मनसेने म्हटले आहे. मनेसेचे नेते संदिप देशपांडे, संतोष धुरी आणि नितिन सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आणला आहे.

“एका ठिकाणी लोकांची सेवा करायची असे नाटक करायचे, आणि दुसऱ्या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा, आपल्या लोकांना मागच्या दारांनी कामे मिळवून द्यायची. त्यातुन महानगर पालिकेचे पैसे लाटायचे,” असे मनसेनेते संदिप देशपांडे यांनी म्हटले. या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्विकारुन महापौरांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी देखील मनसेने केली आहे.

- Advertisement -

कोरोना सेंटर उभारणीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसेने केला आहे. कोणतीही पडताळणी न करता काम दिली, असे संदिप देशपांडे यांनी म्हटले. किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कोणताही अनुभव नसताना कोरोना सेंटर उभारणीची कामे देण्यात आली. शैला प्रशांत गवस, गिरिश रमेश रेवणेकर, प्रशांत महेश गवस, साईप्रसाद किशोर पेडणेकर अशी संचालक पदी असलेल्यांची नावे आहेत. कोरोनाच्या काळात पालिकेने कोरोना सेंटर उभारणीसाठी पैसा उपलब्ध करुन दिला, हे पैसै आणि कामे शिवसेनेने आपआपसात वाटून घेतली, असा आरोप मनसेने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -