घरमनोरंजनया भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी नवाजुद्दीनने घेतली होती डॉक्टरांची मदत

या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी नवाजुद्दीनने घेतली होती डॉक्टरांची मदत

Subscribe

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच कपील शर्माच्या कॉमेडी शोमध्ये आला होता. या शो दरम्यान त्याने ही माहिती दिली.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नेहेमीच आपल्या भुमिकांसाठी चर्चेत असतो. भूमिका खऱ्या वाटाव्यात म्हणून तो अधिक श्रम घेऊन त्यावर काम करत असतो. यशस्वी अभिनेता होण्यासाठी नवाजुद्दीन प्रत्येक भूमिकेसाठी वेगळी तयारी करतो. प्रेक्षकही नावजुद्दीनच्या भूमिकांना चांगला प्रतिसाद देतांना दिसतात. मात्र काही भूमिका करताना नवाज त्या भूमिकेमध्ये इतका खोलात जातो की त्यालाही बाहेर येण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. नवाजुद्दीनने ही माहिती कपील शोच्या कार्यक्रमात दिली आहे. नवाजुद्दीनचा आगामी चित्रपट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो कपील शोच्या कार्यक्रमात आला होता. ठाकरे चित्रपटादरम्यान आलेले अनूभव नवाजुद्दीनने यावेळी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui) on

 कोणती होती ती भूमिका

नवाजुद्दीन सिद्दीकीचा २०१६ साली प्रकाशित झालेला चित्रपट रामण राघव हा खूप गाजला नाही. मात्र यामध्ये नवाजुद्दीने केलेल्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले. ही भूमिका साकारण्यासाठी नवाजुद्दीनने खूप परिश्रम घेतले होते. नवाजुद्दीन या भूमिकेत घूसला होता यामधून बाहेर येण्यासाठी त्याने डॉक्टरांची मदत घेतली होती. हा चित्रपत्र सायको किलर रामण राघव च्या जीवनावर आधारित आहे.

 

View this post on Instagram

 

Raman is here to warn you himself! Stay tuned. @nawazuddin._siddiqui @vickykaushal09 @anuragkashyap10

A post shared by Raman Raghav 2.0 (@ramanraag) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -