बॉलिवूडची सर्वात चर्चेत असणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये कंगना रनौत टॉपवर आहे. देशासह जगभरात कंपनाचे करोडो चाहते आहेत. आज बॉलिवूडमधील परखड व्यक्ती म्हणून क्वीन कंगनाकडे पाहिले जाते. यामुळे सतत आपल्या परखड आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना लॅमलाईटमध्ये असते. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. एका छोट्या चाहतीमुळे कंगना चर्चेचा विषय ठरतेय.
कंगनीची नऊ वर्षांची ही चाहती इंस्टग्रामवर छोटी कंगना नावाने व्हायरल होत आहे. नऊ वर्षाच्या या चाहतीवने चक्क कंगनाचेही लक्ष वेधून घेतले आहे. सनम पुरी असे या छोट्या चाहतीचे नाव असू ती सध्या ‘छोटी कंगना’ नावाने प्रकाश झोतात येत आहे. सनम ‘सेम टू सेम’ कंगनाची छोटी कर्बन कॉपी दिसतेयं. इतकेच नाही तर सनमचे केसही कंगनासारखे कुरळे आहे. सनम कंगनाच्या स्टाईलप्रमाणे सगळ्याच प्रकारे कॉपी करते. या छोट्या कंगनाचे इंस्टाग्रामवर ९ हजार फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिकापासून ते कंगनाचा नवा चित्रपट धाकड चित्रपटांमधील कंगनाचे जवळपास सर्वच लुक सनमने कॉपी केले आहेत. कंगनाची बिग फॅन असलेली सनम तिचे डायलॉगही त्याच प्रखरेने आणि फ्लेयरने बोलते. सनम कंपनाला कॉपी करण्यात एवढ्यावरचं थांबली नाही तर तिने कंगनाच्या स्टाईलने फोटो पोझेसही दिल्या आहेत.
View this post on Instagram
या छोट्या चाहतीची स्टोरी खुद्द कंगनानेही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने या चिमुकलीला विचारलं, “अरे बाळा, तू अभ्यास करतेस की, दिवसभर हेच करतेस? यांवर त्या चाहतीने उत्तर दिले की, ती एक ‘क्लास टॉपर’ आहे. कंगना आणि ‘छोटी कंगना’ सनमची पहिल्यांदाच अमृतसरमध्ये भेट झाली. सध्या सोशल मीडियावर कंगनाप्रमाणे तिच्या छोट्या कर्बन कॉपीची देखील चर्चा आहे.
View this post on Instagram