घरमनोरंजनलडाखची गुलाबी थंडी ’बॉईज 2’मध्ये

लडाखची गुलाबी थंडी ’बॉईज 2’मध्ये

Subscribe

कॉलेजविश्वात आणि त्याचबरोबर ओघाने येणार्‍या प्रेमविश्वात नुकतंच पदार्पण झालेल्या मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या, ’बॉईज 2’ मधील ’शोना’ हे रोमँटिक साँग नुकतेच सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आले. लेह लडाखमध्ये चित्रित करण्यात आलेले हे गाणे प्रेमाच्या गुलाबी थंडीची अनुभूती देऊन जातं.

गीतकार मंदार चोळकर यांनी हे गाणं लिहीलं आहे. तर राऊत आणि जुईली जोगळेकरनं गायलं आहे. तर सुमंत शिंदे आणि सायली पाटील या फ्रेश जोडीवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यातील जोडी इतकीच गाण्यातील दृश्यही प्रेक्षकांना नक्की आवडतील.

- Advertisement -

हे गाणे पडद्यावर खूप सुंदर दिसत असले तरी, त्याची पडद्यामागील मेहनत खूप मोठी होती. कारण, बर्फाळ प्रदेशातील प्रतिकूल परिस्थितीचा तडाखा या सिनेमाच्या चित्रीकरणालादेखील बसला होता. तिकडच्या अती थंडीने नाकातून रक्त आल्यामुळे अनेकजणांना दवाखान्यात दाखल करावे लागले होते. इतकेच नव्हे तर, या गाण्याच्या आणि इतर काही भागांच्या चित्रिकरणादरम्यान कलाकारांना ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करून श्वास घ्यावा लागला होता.

शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणार्‍या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये बघायला मिळाली. महाविद्यालयीन तरुणांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि रोमान्स जरी दिसून येत असला तरी, आपापसांतील वैर, गटपद्धती आणि त्यांच्यातील वादविवाद देखील आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय ओंकार भोजणे, सोहम काळोखे, सायली पाटील, शुभांगी तांबळे आणि अक्षता पाडगावकर हे नवीन चेहरेदेखील या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. या नवोदित कलाकारांसोबतच यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील या प्रसिद्ध कलाकारांच्या देखील यात प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -