घरमनोरंजनलतादिदींचा वाढदिवस

लतादिदींचा वाढदिवस

Subscribe

भारतरत्न लता मंगेशकर आज आपला 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या सुमधुर आवाजाने देशच नव्हे तर जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या लतादीदींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे गायकीचा वारसा असलेल्या घरात झाला होता. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या तालमीत गायकीचे तसेच अभिनयाचेही धडे त्यांनी घेतले होते. 5 वर्षाच्या असताना आपल्या वडिलांच्या साथीने त्यांनी रंगभूमीवर पाऊल टाकत अभिनयाची सुरुवात केली. लता मंगेशकर यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. लतादीदींना वसंत जोगळेकर यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या कीर्ती हसाल यांच्या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. मात्र काही कारणास्तव हे गाणे चित्रपटात दाखवले गेले नाही.

पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर घरातील सर्व सदस्यांची जबाबदारी कुटुंबातील मोठी मुलगी या नात्याने लताजींवर आली. त्यावेळी त्यांनी काही मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 1947 साली वसंत जोगळेकर यांनी त्यांच्या आपकी सेवा में या चित्रपटासाठी लतादीदींना पार्श्वगायनाची संधी दिली. इथून त्यांच्या पार्श्वगायनाला सुरुवात झाली. मात्र 1949 साली आलेल्या महल चित्रपटातील आयेगा आनेवाला… या गाण्यापासून त्यांना प्रसिद्धी मिळाली.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते 2000 सालापर्यंत लतादीदींनी आपल्या आवाजाची मोहिनी प्रेक्षकांवर कायम ठेवली. मधुबालापासून माधुरी दीक्षितपर्यंत त्यांनी सर्व नायिकांना आपला आवाज दिला. वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -