घरताज्या घडामोडीपुण्यातील रिकामटेकड्या नेत्यांच्या त्रासामुळे पक्षाला रामराम, रुपाली पाटील यांची मनसेच्या राजीनाम्यानंतर पहिली...

पुण्यातील रिकामटेकड्या नेत्यांच्या त्रासामुळे पक्षाला रामराम, रुपाली पाटील यांची मनसेच्या राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रीया

Subscribe

मनसेच्या डॅशिंग महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम केला आहे. मनसेतील सर्व सदस्य पदाचा रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे अनेक चर्चा सुरु होत्या. रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करताना माझ्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. मनसेमध्ये पक्षातील काही रिकामटेकडे नेते साथ देत नसल्यामुळे आणि पक्षातील लोक बदलत नसल्यामुळे मी स्वतः बदलण्यासाठीच पक्षातून बाहेर पडले असल्याचे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे. सध्या दोन पक्षांकडून ऑफर आली असून विचार करत असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले आहे.

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मंगळवारी मनसेच्या सदस्य पदाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजीनामा देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. बुधवारी मनसेच्या सदस्याचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कारण सांगितले असल्याचे रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायम ह्रदयात राहतील परंतु मनसेचा राजीनामा देत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. मनसेतून बाहेर पडल्यानंतर सध्या दोन राजकीय पक्षांकडून ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

रिकामटेकड्या नेत्यांमुळे राजीनामा

राजीनाम्याचे कारण विचारले असता रुपाली पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मनसेमध्ये गेल्या १४ वर्षांपासून कार्यरत आहे. पक्ष अध्यक्षांकडून आणि कार्यकर्त्यांकडून देखील निस्वार्थ प्रेम मिळालं आहे. परंतु पक्षात जे रिकामटेकडे नेते आहेत. हे नेते साथ देत नाही. लोकांची काम करत असताना मला अडचणी निर्माण होत आहेत. काही नेते बदलत नसल्यामुळे स्वतः बदलण्यासाठी हा निर्णय़ घेतला आहे. पक्षातील नेत्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन वारंवार माहिती दिली असल्याचे रुपाली पाटील म्हणाल्या तसेच राजीनामा हा वैयक्तिक कारणामुळे दिला आहे.

ज्या पक्षात १४ वर्ष काम केले त्या पक्षाला सोडताना फार वेदना होत आहेत. परंतु पक्षातील निस्वार्थ प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नेहमी ऋणात राहील. राज ठाकरे यांना पाहून राजकारणात आली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात प्रवेश केला होता. राज ठाकरे यांच्या भाषणांनी प्रभावित झाल्यामुळे मनसेमध्ये प्रवेश केला होता. ते नेहमी माझ्या ह्रदयात राहतील असेही रुपाली पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

भाजपकडून २०१७ मध्ये पक्ष प्रवेशाची ऑफर

रुपाली पाटील यांना भाजपकडून ऑफर आली आहे का? असे विचारला असता त्यांनी आपल्याला सध्या तरी ऑफर आली नसून २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी ऑफर आली होती असे सांगितले आहे. तर सध्या दोन पक्षांकडून ऑफर आली आहे. पंरतु त्यावर विचार सुरु असून लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले आहे.

वेळ आल्यावर देशपांडे, तात्यांना उत्तर देणार

रुपाली पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्याचे मनसे नगरसेवक वसंत मोरे (तात्या) आणि मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांचे ट्वीट व्हायरल होत आहे. यावरुन रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे की, त्यांना दुःख झाले असेल पण योग्य वेळ आल्यावर मी त्यांना उत्तर देईल. शेवटी त्यांची बहीण आहे. एकाच साचामध्ये आम्ही तयार झालो आहोत असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.


हेही वाचा : ‘तुमचं नाव माझ्या ह्रदयात कोरलेलं राहील’ रुपाली पाटील यांचा मनसेला रामराम, राष्ट्रवादीत करणार प्रवेश


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -