घरमनोरंजनतेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांनी घेतली कोरोना लस

तेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांनी घेतली कोरोना लस

Subscribe

दक्षिणात्य अभिनेता नागर्जुन याने नुकतीच कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.यासंबंधीची एक पोस्टही त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.

देशात सध्या दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सध्या वेगाने सुरु आहे. लसीकरणाच्या या टप्प्यात ६० वर्षापुढील जेष्ठ नागरिकांना आणि ४५ ते ५९ वयोगटातील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. या टप्प्यात बॉलिवूडमधील ज्येष्ठ कलाकारांनीही कोरोना लस घेतली. यात आता तेलुगु अभिनेता नागार्जुन यांनी देखील कोरोना लसीचा डोस घेतला आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीतील लस घेणारे नागार्जून हे पहिले सुपरस्टार आहेत. हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात नागार्जुन अक्किनेनी यांनी ‘कोवॅक्सिन’ या कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला. यासंबंधीची माहिती स्वत: नागार्जून यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरुन शेअर केली. सोबतच त्यांनी लोकांना लस घेण्याचे आवाहनही केले आहे.

- Advertisement -

लसीकरणासंबंधी ट्विटरवर पोस्ट करताना नागार्जून म्हणाले की, ”कोवॅक्सिनची पहिला डोस आज मी घेतला. लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्वांना मी लस घेण्याची विनंती करतो.” त्याचबरोबर त्यांनी लसीकरणासाठी करण्यात येणाऱ्या रजिस्ट्रेशनसाठीची लिंकही शेअर केली आहे. स्वत:चा वॅक्सिन घेतानाचा फोटोही त्यांनी यासोबत शेअर केला आहे. नागार्जून यांचा ‘वाईल्ड डॉग’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचा हा नवा अॅक्शनपट येत्या २ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.


हे वाचा- दूरदर्शनच्या ‘गजरा’ कार्यक्रमाचे निर्माते विनायक चासकर काळाच्या पडद्याआड

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -